Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 6 जणांचा मृत्यू, 213 जनावरांचा बळी, शेकडो घरांचे नुकसान, आतापर्यंतची आकडेवारी समोर
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये धाराशिवमध्ये 3 जण वाहून गेले. तसेच नांदेड आणि बीडमध्ये प्रत्येकी 1 अशा 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत (Marathwada Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे एकूण 6 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात वीज (Lightning) पडून 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. धाराशिवमध्ये 3 जण वाहून गेले. तसेच नांदेड आणि बीडमध्ये प्रत्येकी 1 अशा 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात 5 तर बीड (Beed) जिल्ह्यात 1 व्यक्ती जखमी झाली आहे.
जनावरांचे नुकसान (Animal Loss)
अतिवृष्टीत एकूण 213 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यामध्ये धाराशिवमध्ये 81, जालना (Jalna) जिल्ह्यात 40 जनावरे दगावली. दुधाळ जनावरांपैकी 98 मोठी आणि 86 लहान जनावरे, तर ओढकाम करणारी 25 मोठी आणि 7 लहान जनावरे दगावली आहेत.
मालमत्तेचे नुकसान (Property Damage)
मराठवाड्यात एकूण 892 खाजगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यापैकी धाराशिवमध्ये 611, लातूर (Latur) मध्ये 89, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये 73, नांदेडमध्ये 56, परभणी (Parbhani) मध्ये 42 आणि जालन्यात 21 घरांचे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक सुविधांचा फटका (Public Infrastructure Damage)
सार्वजनिक मालमत्तेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 रस्ते वाहून गेले आहेत. तसेच मराठवाड्यात एकूण 9 पूल वाहून गेले असून यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे 4, बीडचे 4 आणि परभणीतील 1 पूल समाविष्ट आहेत. याशिवाय 8 शाळांचे नुकसान झाले असून धाराशिवमधील 6 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 2 शाळांचा समावेश आहे.
Godavari Flood : गोदावरी नदीला महापूर
गोदावरीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात दरवर्षी जोरदार पाऊस होतो. त्याच पाण्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणीसाठा जमा होतो. मात्र, सध्या राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यातच नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदावरीला पूर आला आहे. पुढे संभाजीनगरमध्येही पाऊस सुरू झाल्यानं गोदावरीच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून जायकवाडी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे 27दरवाजे उघडण्यात आलेत. पुढे नांदेड जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्यानं तिथंही गोदावरी नदी दुधडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमधील शेतांमध्ये पाणी साचलं आहे.
Jayakwadi Dam : जायकवाडीचा विसर्ग वाढवला
छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून सध्या 2 लाख 92 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजातून विसर्ग सुरू असून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:

























