Marathwada Cabinet Meeting: मंत्रीमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील शाळांना सुट्टी; रस्ते बंद असल्याने घेतला निर्णय
Marathwada Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक होत असलेल्या परिसरात अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे.
Marathwada Cabinet Meeting in Aurangabad : तब्बल सात वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत असून, या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही खाजगी शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतुकीत मोठा बदल केला आहे. मंत्रिमंडळाची बैठक होत असलेल्या परिसरात अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. सोबतच जालना रोडवरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. त्यात शहरातील पाच रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काही खाजगी शाळांनी आज शाळांना सुट्टी दिली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, त्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने शाळेच्या बस अडकण्याची भीती आहे. सोबतच याचा पालकांना देखील मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे काही शाळांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.