एक्स्प्लोर
Marathwada Cabinet Meeting : 15 मोर्चे, 14 जणांचा आत्मदहनाचा इशारा; अशी गाजणार मराठवाडा मंत्रीमंडळाची बैठक
Marathwada Cabinet Meeting : औरंगाबाद शहर पोलिसांकडे जवळपास 30 पेक्षा अधिक संघटनांनी मोर्चा, आंदोलनाला परवानगी मागितली होती.
![Marathwada Cabinet Meeting : 15 मोर्चे, 14 जणांचा आत्मदहनाचा इशारा; अशी गाजणार मराठवाडा मंत्रीमंडळाची बैठक Marathwada Cabinet Meeting 15 marches 14 people warned of self immolation Marathwada Cabinet Meeting : 15 मोर्चे, 14 जणांचा आत्मदहनाचा इशारा; अशी गाजणार मराठवाडा मंत्रीमंडळाची बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/0c06a295c7ac90617f17a09a376cbd1c1694836252970737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maratha Reservation march
औरंगाबाद : 2016 नंतर म्हणजेच सात वर्षांनंतर मराठवाड्यात (Marathwada) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे (Marathwada Cabinet Meeting) मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान याच बैठकीच्या निमित्ताने विविध संघटना, राजकीय पक्षांनी देखील या मंत्रिमंडळावर मोर्चा, निषेध, आंदोलनाची घोषणा केली आहे. औरंगाबाद शहर पोलिसांकडे जवळपास 30 पेक्षा अधिक संघटनांनी मोर्चा, आंदोलनाला परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे क्रांती चौक ते भडकलगेट असा मोर्च्याचा मार्ग असणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जवळपास 14 जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- आज एकूण 15 मोर्चे निघणार आहे.
- एकूण 06 एकूण धरणे, निदर्शने होणार आहे.
- वेगवेगळ्या मागणीसाठी 4 निवेदन दिले जाणार आहे.
'या' मागण्यांसाठी निघणार मोर्चे...
- नायकडा आदिवासी व लमाण समाज विकास फाउंडेशनतर्फे खडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा.
- पालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी बहुजन कामगार शक्ती महासंघाचा मोर्चा.
- स्थायी समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मराठवाडा विभागाला पाण्याची तूट भरून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी शासनाने घेण्यासाठी मोर्चा निघणार.
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलन करण्यात येणार आहे.
- आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमात परिषदेकडून आदिवासी कोळी मल्हार कोळी या जमातीवर चाळीस वर्षांपासून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, तसेच जातीचे वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळत नसल्याने मोर्चा निघणार.
- पांढरे वादळ महिला मोर्चा कृती समितीतर्फे विमुक्त जाती प्रवर्गातील बोगस घुसखोरीविरुद्ध मोर्चा निघणार आहे.
- वंचित बहुजन आघाडीतर्फे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चा निघणार.
- भारतीय क्रांती दलाकडून शेतकरी, कष्टकरी, दुष्काळ, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा निघणार.
- श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटनेकडून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा निघणार.
- कामगार एकता संघटनेकडून मनपा रेड्डी कंपनी तसेच कचरा संकलन कामगारांच्या वेतनवाढ, वेतन वेळेवर मिळण्यासाठी मोर्चा निघणार.
- शिवसेना महाराष्ट्र प्रदेश बक्कर कसाब खाटीक संघटनेकडून कत्तलखाना फी ५० रुपयांवरून १५ रुपये करण्यासाठी. तीन कत्तलखाने उभारण्यासाठी मोर्चा निघणार.
- आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पैसे तत्काळ मिळण्यासाठी मोर्चा निघणार आहे.
- मराठा क्रांती मोर्चा, पैठण तालुका मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी मंत्रीमंडळ बैठकीवर धडकणार.
धरणे व निदर्शने
- भाकपकडून मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती व विविध प्रश्नांवर पैठण गेट किंवा शहागंज गांधी पुतळा.
- बार्टी बचाव कृती समितीकडून सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत विविध योजनांच्या मागण्यांसाठी आंदोलन.
- बहुजन मुक्ती मोर्चाकडून स्मार्ट सिटी परिसरात आंदोलन.
- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन इंग्रजी शाळांच्या मागण्यांसाठी आंदोलन.
- कास्ट्राइब बॅनरखाली शासकीय सेवेत असताना खासगी रुग्णालय चालविणाऱ्यांविरोधात अनिल मगरे यांची निदर्शने.
- मराठवाडा शिक्षक संघाकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन.
इतर महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)