एक्स्प्लोर

Manoj Jarange : आम्ही शांतच, त्यांचेच लोक त्यांना पाडणार आणि नाव मराठ्यांचं घेणार; मनोज जरांगेंचा रोख कुणाकडे? 

Maratha Reservation : वेळ पडला तर एखाद्या ठिकाणी उमेदवार देणार नाही, पण तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

छत्रपती संभाजीनगर : जातीच्या नावाखाली आम्हच्यावर अन्याय करू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचं नाव घेणार असं सांगत मनोज जरांगे यांनी काहीही झालं तरी मराठ्यांनी शांत राहावं असं आवाहन केलं. 

मनोज जरांगे काय म्हणाले? 

13 तारखेला मतदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता, मात्र एकदा 13 तारीख झाली की आम्ही वाईट अशी तुमची नियत. सर्व मराठा समाजाला आव्हान करतो की सगळ्यांनी शांत राहा, फक्त एक महिनाभर शांत राहा. काहीजण म्हणतात निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. आता कोण काय करतो ते आम्ही पाहून घेऊ. आपण शांत राहू, त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहे आणि नाव मराठ्यांचं घेणार आहेत. फक्त शांत राहून कोण काय करतो पाहा. कोणी काय पोस्ट टाकतो, त्याचं नाव लिहून ठेवा. कोण पडला, कोण निवडून आला याचे उत्तरही देऊ नका. 

विरोधात गेला तर तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही

तुमच्यावर जर काही वेळ आली, तुमचा काही घातपात होण्याचा अंदाज दिसला तर मी म्हणतो म्हणून शांत बसू नका. जे लोक जात जातिवाद करून मराठ्यांच्या अंगावर येतील त्या जातीचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही. त्यांना सत्तेत घुसू द्यायचं नाही. वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडल्याशिवाय शांत राहण्याचं नाही.

बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, संभाजीनगरमधून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडूनही धक्का लागता कामा नये. पुन्हा असं म्हणू नका की आम्ही तिकडे का निघालो. मी एक महिना शांत बसणार, पण या महिन्यात काही झालं तर आम्हालाही गुंडगिरीचे चांगले अड्डे माहीत आहेत. 

जातीच्या नावाखाली माझ्या मराठा समाजावर आन्याय करू नका. नाहीतर तुम्हाला कायमचं संपवून टाकेन. तुम्ही आज निवडून याल किंवा पडाल, तुम्हाला वाटत असेल हे होऊन गेलं. वेळ पडली तर एखाद्या ठिकाणी उमेदवार देणार नाही, पण तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही.

आम्हाला आरक्षणाला गुलाल हवाय

या लोकसभेच्या निवडणुकीच्या गुलालमध्ये आम्हाला आनंद नाही. आमच्या लेकराचं कल्याण करण्यासाठी आरक्षणाचा गुलाल आम्हाला हवाय. एकजूट फुटू देऊ नका. जात मोठी करायची आणि जातीचे लेकर मोठे करायचे आहे. सगें सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हाटत नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. 

ओबीसी मधून आरक्षण मागितलं तर दंगली होतील असे मला काही जण म्हणत होते. मात्र लढा यशस्वी व्हायला आला की हे लोक भीती दाखवत असतात. दोनशे वर्षाच्या नोंदी सापडल्या. 1967 ला जे आरक्षण दिले होते ते फक्त एका शासन निर्णयावर दिलं. सगळ्यात ओरिजनल ओबीसी कोण आहे ते म्हणजे मराठा, कारण शेकडो नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहे.

आरक्षणाची किंमत एका टक्क्यावरून हुकलेल्या लेकराला विचारा. आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही असं म्हणताय की ओबीसी विरुद्ध मराठा वाद होतोय. आमचं आहे म्हणून द्या म्हणतोय, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागत नाही आणि वाद व्हायचा प्रश्नच येत नाही. 

छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल

तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकटे 60 टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो की काय? त्यानंतर म्हणे एसटी फुल भरलेली आहे. मी म्हटलं मला दार उघडू दे. तू ते एसटीमध्ये एकटाच तंगड्या लांबून बसलाय तुला तंगडी सकट बाहेर ओढतो.

तुझी नियत चांगली नाही, तुला फक्त खायची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाऊन घेतलं. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्याचाच सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाचा धक्का लागत नाही, तरीही तुम्ही त्यांना तुमच्या सभेला बोलावता. 

धनगर आणि मुस्लिम बांधवांना ही आरक्षण कसं मिळत नाही हे सुद्धा मी बघतो. मराठ्यांनी आपला ज्वलंत प्रश्न सुटल्यानंतर धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणासाठी लढायचं आहे.

मला अटक करायचा डाव

सरकारने माझ्याविरुद्ध अटक करण्याचा डाव रचला, माझ्यावर एसआयटी नेमली. आता हे मला जेलमध्ये टाकतील. रोज माझ्यावर दोन-तीन गुन्हे दाखल करतील आणि रात्रीतून तडीपार करायचं. मी तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी या राज्यातले मराठे त्या राज्यात बोलावून मोर्चे काढेणार.

मी जेलमध्ये सडेल पण माग हाटणार नाही. जेलमध्ये सुद्धा सगळे मराठ्यांचे कैदी एकत्र करीन आणि मोर्चा काढेन. कारण मी माझं जीवन समाजासाठी समर्पण केले. 

फडणवीस आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलमध्ये टाकाल, पण हे सहा कोटी मराठ्यांचा आग्या मोहोळ गप्प बसणार नाही, तसे स्वप्न तुम्ही अजिबात बघू नका. गोडी गुलाबीने प्रश्न मार्गी लावा.सगेसोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढा त्याची अंमलबजावणी करा. तुम्ही आंदोलन हलक्यात घेतलंय राजकारण सुद्धा हलक्यात घेऊ नका. नाहीतर सगळ्यांचा टांगा पलटी करेन. त्याशिवाय शांत बसणार नाही.

मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, फक्त आमचं आरक्षण आम्हाला द्या. कोणत्याही नेत्याच्या पुढे पुढे करू नका. तुमच्या मुलांना शिकवा, अधिकारी करा. तुमच्याच लेकराच्या मागे मागे पळतील हे लोक. नेत्याला आणि त्याच्या मुलाला मोठं करण्याचे स्वप्न बंद करा. तुमच्या जीवावरच नेते लोक डेरिंग करत आहेत. त्यामुळे तुम्ही थोडं अंग काढून घ्या, मग कसं होतं पाहा.

तुमच्या जीवाच्या मतावर हे लोक दोन दोन कोटीच्या गाडीत बसायला लागलेत. त्यामुळे तुम्ही यांच्या पुढे पुढे करू नका. नेत्यांचा मुलगा परदेशात शिकायला जातो आणि तुम्ही त्याच्या मुलाला आदराने भैया म्हणता. ते मात्र तुमच्या मुलांना काहीही म्हणतात. निवडणूक आल्यावर हे लोक चपलासकट पाया पडतात. मात्र निवडणूक झाल्यावर कुठे गुल होतात तेच कळत नाही.

4 जूनला सगळ्यांनी अंतरवाली सराटीकडे या एवढेच आवाहन करतो. कारण आरक्षण घेतल्याशिवाय यांना सुट्टी द्यायची नाही. मला उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. कोट्यवधींच्या संख्येने मराठ्यांनी एकत्र यावं. मी मॅनेज होत नाही हे कळल्यानंतर सरकारने डाव रचला की माझ्या कुटुंबावर हल्ला चढवायचा. कोणत्या जातीचे लोक जाणून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते सुद्धा आपण बघू. माझं एकच स्वप्न आहे. की करोडो मराठ्याचे लेकरं मोठी व्हावेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget