खैरेंनी कितीही यज्ञ केले तरीही 2024 पर्यंत आमचं भक्कमपणे सरकार चालणार; भुमरेंची टीका
Sandipan Bhumre : खैरे यांनी पूजापाठ करत बसावे आणि आम्ही 2024 पर्यंत सरकार भक्कमपणे चालवून दाखवतो, असे भुमरे म्हणाले.
Sandipan Bhumre On Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर घटनापीठाने निकाल दिला आहे. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता यावरूनच अनेक प्रतिक्रिया येत असून, शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. तर यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर निशाणा साधला आहे. "न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, खैरे यांनी पूजापाठ करत बसावे आणि आम्ही 2024 पर्यंत सरकार भक्कमपणे चालवून दाखवतो, असे भुमरे म्हणाले.
यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, न्यायालयाने निकाल दिला असून तो आम्हाला मान्य आहे. पण आमचे मित्र चंदकांत खैरे बऱ्याच दिवसांपासून यज्ञाला बसले आहे. त्यांची पूजा अर्चा सुरु आहे. तसेच पाण्यात देव बुडून बसले आहेत. पण त्यांना म्हणावं की, तुम्ही असेच यज्ञ करत रहा. आम्ही 2024 पर्यंत भक्कमपणे सरकार चालवणार आहोत. तसेच पुढे देखील एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली युतीच सरकार येणार आहे. त्यामुळे खैरे यांनी फक्त पूजा करत बसावी आणि तेवढच काम सध्या त्यांच्याकडे उरलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणताही धोका राहिलेला नाही
पुढे बोलताना भुमरे म्हणाले की, राज्याच्या सत्तासंघर्षावर आज निकाल आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज आनंद आणि जल्लोष साजरा केला जात आहे. तर आम्हाला देखील याचा आनंद असून, आता ही चर्चा इथेच संपली आहे. तर स्वतः न्यायालयाने आता निकाल दिला असल्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणताही धोका राहिलेला नाही. मात्र आता आमच्या विरोधकांना आता धोका आहे. तसेच काही प्रमाणत ताशेरे ओढले असले तर काय, आता न्यायालयाने निकाल दिला असून तो आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने दिलेला निकाल आम्ही नाकारत नाही. पण शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचा महत्वाचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
नैतिकतेचा विषयच येत नाही.
कोण काय बोलते यापेक्षा न्यायालयाने काय म्हटले आहे हे महत्वाचे आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे नैतिकतेच विषयच येत नाही. यांना काहीतरी बोलायचं म्हणून राजीनामा देण्याची मागणी करतात. न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, शिंदे सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे येथे नैतिकतेचं विषय येत नाही. त्यामुळे उरलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजे, असेही भुमरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: