Nath Shashti Festival : पैठणच्या नाथषष्ठी उत्सवात रावसाहेब दानवेंनी खेळली फुगडी; पाहा व्हिडीओ
Raosaheb Danve : त्यांच्या याच फुगडीचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
![Nath Shashti Festival : पैठणच्या नाथषष्ठी उत्सवात रावसाहेब दानवेंनी खेळली फुगडी; पाहा व्हिडीओ maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Raosaheb Danve played Phugdi in Paithan Nathshashti festival Nath Shashti Festival : पैठणच्या नाथषष्ठी उत्सवात रावसाहेब दानवेंनी खेळली फुगडी; पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/639306a9c71c14f7cc013892c63a2e701678712853711443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nath Shashti Festival 2023: आजपासून पैठणच्या नाथ षष्ठीला (Nath Shashti Festival) सुरवात झाली असून, तीन दिवस ही यात्रा चालणार आहे. दरम्यान नाथाच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पैठण नगरीत येत आहेत. तसेच आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची देखील या ठिकाणी उपस्थिती पाहायाला मिळाली. नाथाच्या दर्शनासाठी आलेल्या दानवे यांनी भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यासेबत नाथ षष्ठी सोहळ्यात फुगडी खेळून आनंद लुटला. त्यांच्या याच फुगडीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे राज्यात पंढरपूरनंतर पैठणची वारी दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाते.
ग्रामीण भागातील साधेपणा जपणारे नेते म्हणून रावसाहेब दानवे यांना ओळखले जाते. दिल्लीत असो की मतदारसंघ असो, दानवे हे अत्यंत साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक सणासुदीच्या काळात देखील ते आपली संस्कृती पाळताना पाहायला मिळतात. दरम्यान त्यांच्या मतदारसंघातील पैठणच्या नाथ षष्ठीला देखील दानवे प्रत्येकवेळी आवर्जून हजर असतात. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या नाथ षष्ठीला दानवे हजर होते. तसेच यावेळी खासदार सुजय विखे देखील उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी सामान्य वारकऱ्यांसारखं फुगडी खेळून नाथांच्या भारुडांवरही ठेका धरला. त्याच्या हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)