एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची धडक मोहीम, 26 दिवसांत 650 अतिक्रमण काढले

Chhatrapati Sambhaji Nagar : महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने आतापर्यंत शेकडो अतिक्रमणावर हातोडा घातला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Bench) आदेशानंतर शहरातील सिडको-हडकोतील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने आतापर्यंत शेकडो अतिक्रमणावर हातोडा घातला आहे. तर अनेक पक्के बांधकामावर जेसीबी फिरवण्यात आला आहे. तर मागील 26 दिवसांत तब्बल 650 अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. 

शहरातील वाढत्या अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महापालिकेचे वेळोवेळी कान टोचले आहे. तर काही दिवसांपूर्वी मनपाच्या अधिकाऱ्यांना दंड देखील सुनावला होता. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील सिडको-हडकोसह शहरातील सर्वच अतिक्रमणाविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. महापालिकेने 2 मार्चपासून कारवाई सुरू केली असून, कारवाईसाठी स्वतंत्र दोन पथके स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान मागील 26 दिवसांत तब्बल 650  अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मागील काही दिवसातील कारवाई...

  • आरसीसी बांधकाम : 65 कारवाई  
  • दुकाने, गॅरेज,टपऱ्या : 50 कारवाई 
  • पत्र्याचे शेड, रसवंत्या, शटर, जाळीचे शेड : 210 
  • चारचाकी व हातगाड्या : 65 
  • संरक्षण भिंत, लोखंडी गेट : 15 
  • जाहिरातींचे डिजिटल बोर्ड व पोस्टर : 98 
  • रस्ताबाधित अतिक्रमणे, ओटे, झेंडे इ. अतिक्रमणे : 130 

आणखी 26 अतिक्रमण काढले...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत बुधवारी पुन्हा 26 अतिक्रमणे काढण्यात आली. ज्यात सिडको एन-09, श्रीकृष्ण नगर, हडको, टीव्ही सेंटर सेंटर ते सावरकर चौक पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावर बांधकामे आणि लोखंडी जीने टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर एकूण 26 मालमत्ता धारकांनी तर, काही नागरिकांनी ऑड शेपच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केले होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाई करत ते काढून घेतले आहे. 

अतिक्रमणाची पाहणीसाठी स्वतः आयुक्त उतरले रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने,महापालिका प्रशासन कामाला लागली आहे. दरम्यान सिडकोतील अतिक्रमण हटाव कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अचानक शहरातील कॅनॉट प्लेस भागात तासभर फिरून पाहणी केली. यावेळी वॉक वे गिळंकृत करणाऱ्या चार हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्त चौधरी यांनी यावेळी दिले. तसेच या भागात अनधिकृत पार्किंग होऊ नये याबाबत त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची प्रियकरासह रेल्वेसमोर उडी; तरुणाचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
Thane Crime: मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे,हेचं पांडुरंगाकडे साकडं
Nashik Gangapur Dam  : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर यांचा संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा
Jaykumar Gore : आषाढीपूर्वी पंढरपुरात महासफाई अभियान पालकमंत्र्यांसह नागरिकांच्या हातात खराटे
Kolhapur Rain : पंचगंगेची पाणीपातळी वाढली, कोल्हापुरात पावसाची काय स्थिती? माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
Thane Crime: मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Raigad Accident: कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं,  मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं, मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
Ahmedabad plane crash: 275 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद  विमान अपघातात कारवाईचा पहिला हातोडा; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागितला
275 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद विमान अपघातात कारवाईचा पहिला हातोडा; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागितला
Embed widget