एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ सभे'ला परवानगी मिळाली, मात्र 'हे' नियम पाळावे लागतील
Chhatrapati Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) 'वज्रमुठ सभे'ला अखेर शहर पोलिसांनी (City Police) परवानगी दिली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार असून, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. तर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत.
महत्वाच्या अटी आणि शर्ती
- सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात यावे
- सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे
- जाहीर सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 वेळेतच घ्यावी, तसेच कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.
- कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या.
- सभेसाठी येताना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
- कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये.
- निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर, गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांच्याकडे द्यावी.
- सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
- सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी.
इतर महत्वाच्या बातम्या :
स्वा. सावरकरांवरील टीकेनंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळलं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement