Gharkul Scam: छ. संभाजीनगरच्या घरकुल निविदा घोटाळ्यात दोन हजार पानांची कागदपत्रे ईडीने घेतली ताब्यात
Chhatrapati Sambhaji Nagar News : आतापर्यंत या कथित घरकुल निविदा घोटाळ्यात दोन हजार पानांची कागदपत्रे ईडीने घेतली ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियात (Tender Process) घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर याप्रकरणी ईडीने (ED) देखील चौकशी सुरु केली आहे. तर आतापर्यंत या कथित घरकुल निविदा घोटाळ्यात दोन हजार पानांची कागदपत्रे ईडीने घेतली ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठवड्यात ईडीच्या मुंबईतील कार्यालयात महापालिका उपायुक्तांची सलग चार दिवस चौकशी झाली, असून त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहे.
महानगरपालिका अंर्तगत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात चाळीस हजार घरे बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेत ठेकेदार कंपनीने रिंग करून, एकाच लॅपटॉपवरून तीन कंपन्यांच्या नावाने निविदा भरल्या होत्या. दरम्यान याबाबत महानगरपालिका प्रशासनाने अधिक चौकशी केल्यावर महापालिकेची फसवणूक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानुसार या प्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात 19 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याच प्रकरणात आता ईडीने देखील चौकशी सुरु केली.
तत्कालीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
तर काही दिवसांपूर्वी ईडी शहरातील वेगवेगळ्या 9 ठिकाणी छापेमारी करत अनेक कागदपत्रे ताब्यात घेतेले होते. तसेच महापालिका उपायुक्त तथा पंतप्रधान आवास योजनेच्या प्रमुख अपर्णा थेटे यांची देखील गेल्या आठवड्यात सलग चार दिवस मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी चौकशीदरम्यान थेटे यांनी अनेक कागदपत्रे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच हार्डकॉपी आणि सॉफ्टकॉपीच्या स्वरूपात ही कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आतापर्यंत ईडीने दोन हजार पानांची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान याचवेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी या प्रकरणाशी संबधित तत्कालीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत...
बीबी नेमाने: महापालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेची निविदा प्रक्रिया सुरू असतानाम, बीबी नेमाने अतिरिक्त आयुक्त होते. तर निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली आहे का? याची माहिती घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे.
सखाराम पानझडे: मनपा आयुक्त यांनी नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सखाराम पानझडे यांचा समावेश आहे. तर पानझडे सध्या महापालिकेतून निवृत्त आहे. तर पंतप्रधान आवास योजनेची निविदा प्रक्रिया झाली त्यावेळी शहर अभियंता होते. तसेच निविदा प्रक्रिया कशी असावी? हे ठरवण्यासाठी जी समिती नेमली होते त्यामधील पानझडे सदस्य होते.
अपर्णा थेटे: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या अपर्णा थेटे प्रमुख आहे. सध्या त्या महापालिकेत उपायुक्त आहेत. तर निविदा प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी थेटे यांच्यावर होती. विशेष म्हणजे सोमवारी त्यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ए.बी.देशमुख : पंतप्रधान आवास योजनेची निविदा ज्यावेळी झाली, त्यावेळी ए.बी.देशमुख नगर रचना विभागाचे उपसंचालक होते. सद्या ते महापालिकेत शहर अभियंता आहेत. तसेच निविदेच्या अटी शर्ती ठरवणं, निविदा कशी असावी, काय असावं यासाठी जी समिती नेमली गेली, त्या समितीचे ए. बी. देशमुख सदस्य आहेत.
संतोष वाहुळे : पंतप्रधान आवास योजना निविदा समितीचे संतोष वाहुळे सदस्य आहेत. सध्या महानगरपालिकेमध्ये मुख्य लेखाधिकारी आहेत. त्यांना देखील आयुक्त यांनी नोटीस पाठवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: पंतप्रधान आवास योजना घोटाळा; छ. संभाजीनगर महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस