छ. संभाजीनगरातील वादानंतर असा आहे शहरात पोलीस बंदोबस्त; रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात
Chhatrapati Sambhaji Nagar: शहरात रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि अक्षरशः पोलिसांच्या 18 गाड्या पेटवून देण्यात आल्या आहेत. ज्यात 16 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र या घटनेनंतर आता शहरात मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर शहरात रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.
शहरात असा आहे पोलिसांचा बंदोबस्त!
- पोलिस अधीक्षक व पोलिस उपायुक्त: 07
- सहायक पोलिस आयुक्त 05
- पोलीस निरीक्षक : 28
- सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक : 52
- जवानांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या : 1200
- रॅपिड अॅक्शन फोर्स: 03
- तसेच शहर पोलीस
400 पेक्षा अधिक लोकांवर...
शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला होता. दरम्यान या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एक मोठा जमाव झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहने पेटवून दिली होती. त्यानंतर जिन्सी पोलिसात या प्रकरणी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून, 6 जणांना अटक करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून आठ पथक तैनात करण्यात आले आहेत. सोबतच घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका...
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद झाल्यावर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, शहरात सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कोणीही अफवा पसरवत असल्यास त्याची माहिती तत्काळ डायल 112 वर किंवा स्थानिक पोलिसांना देण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया...
छत्रपती संभाजीनगर दोन गटात झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेत्यांनी कसं वागावं हे समजावून घ्यायला पाहिजे, कोणीही चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव नाही. तर छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर घटनेप्रकरणी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल