एक्स्प्लोर

अखेर मास कॉपीप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील 'त्या' कॉलेजचे परीक्षा केंद्र रद्द; चौकशीसाठी समितीही गठीत

Chhatrapati Sambhaji Nagar : शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क मास कॉपी सुरु असल्याचा प्रकार एका विद्यार्थीनीने समोर आणला होता. यावेळी पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून 300 ते 500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान या सर्व प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तर या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी मास कॉपी सुरु असल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता. पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून 300 ते 500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देण्यात येत होत्या. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालय परिसरातील फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून हे सर्व पेपर ऑपरेट केले जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. सकाळी पेपर लिहताना कोरा ठेवायचा आणि पैसे देऊन पुन्हा तोच पेपर संध्याकाळी कॉपी करून लिहून दिला जात होता. मात्र एका विद्यार्थिनीने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आणि मोठी खळबळ उडाली. तर माध्यमांमध्ये बातम्या येताच विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहे.  

चौकशीसाठी समितीही गठीत

विद्यापीठ परीक्षेत मास कॉपी झाल्याचा प्रक्रार समोर आल्यावर, विद्यापीठ प्रशासनाने त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे. डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कमिटी गठीत करण्यात आली आहे. तर या चौकशी समितीकडून 24 तासात चौकशी करून अहवाल विद्यापीठ प्रशासनाला दिला जाणार आहे. तर बुधवारी या समितीकडून सलग सहा तास चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीचा अहवाल काय येणार आणि त्यावर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मास कॉपीचा व्हिडिओ आला समोर...

संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी मास कॉपी सुरु असल्याचा आरोप झाला आहे. तसेच या मास कॉपीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात विद्यार्थी कॉपी करताना पाहायला मिळत आहे. कोणी पुस्तकात पाहून उत्तरे लिहत आहे, तर कोणी मोबाईलमध्ये पाहून उत्तरे लिहत आहे. तर काही ठिकाणी बेंचवर तीन-तीन विध्यार्थी बसले असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सोबतच पेपर लिहण्यासाठी पैश्यांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीचा ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Embed widget