Chhatrapati Sambhajinagar: इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर; पुतळा जाळण्याचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar : यावेळी जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपची कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजप (BJP) रस्त्यावर उतरलं आहे. सोमवारी (6 मार्च) रोजी शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने जोरदार निदर्शने केले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपची कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरला विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर अशातच आता भाजपने देखील जलील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. जलील यांच्याविरोधात भाजपने आज जोरदार निदर्शने केली आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने निदर्शने केले आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.
जोरदारी घोषणाबाजी!
या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जलील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, मुर्दाबाद- मुर्दाबाद इम्तियाज जलील मुर्दाबाद, नही सहंगे नही सहंगे दादागिरी नही सहंगे, इम्तियाज जलील यांचं करायचं काय खाली मुंडके वरती पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच जलील यांच्याकडून शहरातील वातावरण खराब करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे यापुढे जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी
भाजपप्रमाणे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील जलील यांना विरोध केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका, त्याची येथे काय गरज आहे. त्यामुळे याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: