छत्रपती संभाजीनगर : या लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे येथील नेतेमंडळी दिवसरात्र एक करून लोकांशी संपर्क साधत आहेत. येथे संदिपान भुमरे (एकनाथ शिंदे यांची शिवसेना), चंद्रकांत खैरे (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांच्यात मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेतील सर्वच नेते भुमरे (Sandipan Bhumre) यांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, खैरे यांना लक्ष्य केलं जातंय. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी तर खैरे यांची एक व्हिडीओ क्लीप दाखवून त्यांच्यावर सडकून टीका केली.
संजय शिरसाट एका सभेला संबोधित करत होते. त्यांनी या भाषणादरम्यान, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत खैरे काही लोकांशी संवाद साधताना दिसतायत. याच व्हिडीओचा आधार घेत शिरसाट यांनी खैरे यांच्यावर टीका केली.
संजय शिरसाट काय म्हणाले? (Sanjay Shirast Criticizes Chandrakant Khaire)
काही लोकांनी 50 खोक्यांचा आरोप केला. ते काही-बाही बोलत होते. त्यांची भाषा कशी बदलली हे तुम्ही पाहिलं आहे का? आता खाण-बाण काहीही नाही. आता माझ्याकडे एक व्हिडीओ क्लीप आली आहे. ती क्लीप पाहून मला प्रश्न पडला की हा माणूस काय वेडा झाला आहे का? या माणसाला नेमकं काय झालंय? मला ही क्लीप कोणीतरी पाठवली आहे, असं शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले, पाहा व्हिडीओ
तुमचे कालचे शब्द आज कुठे गेले?
व्हिडीओ दाखवून झाल्यानंतर शिरसाट यांनी मिश्कील विधान केले. गर्व से कहो हम हिंदू है, आवाज कोणाचा? चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढली होती. ती रॅली तुम्ही पाहिली का? तुम्ही व्हॉट्सअॅपवर आहात, फेसबुकवर असाल. आपण या व्हिडीओला काहीही केलेलं नाही. त्यांनीच हा व्हिडीओ टाकला आहे. हा व्हिडीओ आपला आहे का? त्यांचाच आहे हा व्हिडीओ. हे किती वाईट आहे. तुम्ही याआधी केलेली विधाने, तुमचे शब्द आज कुठे गेली आहेत, असे प्रश्नही संजय शिरसाट यांनी केले.
तिहेरी लढतीत कोण मारणार बाजी? (Sambhajinagar Election)
दरम्यान, संभाजीनगर शहरातील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरत आहे. कारण येथे तिहेरी लढत होणार आहे. संदिपान भुमरे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर पुन्हा एकदा खासदारकी भुषवण्यासाठी खैरे यांच्याकडून जोमात प्रचार केला जातोय. जलील यांनादेखील भुमरे आणि खैरे यांच्यात मत विभागले जातील आणि आपला विजय होईल, अशी आशा आहे. त्यामुळे येथे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी नवा नियम, सिलिंडर महागणार का? येत्या 1 मे पासून काय काय बदलणार?
SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!
आता शेतकरीही होऊ शकतात करोडपती, फक्त करावी लागेल 'ही' शेती; जाणून घ्या सविस्तर