मुंबई : शेतीमध्ये काळानुसार मोठी प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांतील विकास यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. काळानुसार शेतकरीदेखील वेगवेगळ्यांची पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. चांगलं उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या लागवडीकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. दरम्यान, आज आपण अशाच शेतीबद्दल जाणून घेऊ या, ज्यामुळे शेतकरी थेट कोट्यधीश होऊ शकतात. 


चंदनाच्या शेतीचा विस्तार


चंदनाच्या झाडांची (Sandalwood Farming) लागवड केल्यास शेतकऱ्यांना भरघोस फायदा मिळू शकतो. शेतात चंदनाची झाडे लावल्यास आंतरपीकपद्धतीने अन्य पीकदेखील घेता येते. म्हणजेच चंदनाची झाडे लावल्यामुळे दुहेरी फायदा होऊ शकतो. चंदनाची शेती प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते. पण सध्या बियाणांत झालेला विकास आणि शेती करण्याची बदललेली पद्धत यामुळे आजकाल भारताच्या अन्य प्रदेशातही चंदनाची शेती केली जात आहे.  


चंदानाचे प्रामुख्याने चार प्रकार 


चंदानाच्या झाडाचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. यामध्ये पांढरं चंदन, लाल चंदन, नाग चंदन, मयूर चंदन या चंदनांचा समावेश होतो. या चंदनांच्या झाडांतही लाल चंदनाला चांगली मागणी असते. या चंदनाची विदेशातही मागणी असते. मात्र अन्य प्रकारच्या चंदनाची झाडेदेखील तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. 


 चंदनाची झाडे लावायची असतील तर माती कशी हवी? 


शेतात चंदनाची झाडे लावायची असतील तर त्यासाठी पुरक हवामान असायला हवे. तसेच मातीदेखील योग्य असणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदनाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी मातीची पीएच पातळी ही 4.5 ते 6.5 एवढी असायला हवी. चंदनाची झाडे शेतात लावण्यासाठी मे ते जून हा कालावधी पुरक समजला जातो. कोणत्याही नर्सरीमध्ये चंदनाची झाडे सहज मिळतात. 


चंदनाची शेती तुम्हाला कोट्यधीश कसं बनवते? 


चंदनाच्या शेतीमुळे शेतकरी कोट्यधीश होऊ शकतात. चंदनाच्या शेतीतून पैसे मिळण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. पण चंदनाच्या झाडाची एकदा पूर्ण वाढ झाली, की एका झाडापासून लाखो रुपये मिळू शकतात. चंदनाचे रोप हे शंभर रुपयांतही मिळू शकते. शेतात लावल्यावर त्याला पुढचे दहा त पंधरा वर्षे सांभाळावे लागते. या झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर तुम्हाला त्यातून दोन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. समजा शेतात तुम्ही एकूण शंभर झाडे लावली असतील तर तुम्हाला 15 वर्षांत या झाडांपासून दोन कोटी रुपये मिळू शकतात. 


टीप : फक्त माहिती देणे हाच या बातमीचा उद्देश आहे. प्रत्यक्ष शेती करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 


हेही वाचा :


ना बिल्डरची मदत, ना बँकेचे कर्ज, लोकांनीच उभी केली 23 मजली इमारत, मुलुंडमधील पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा!


SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!


घरासमोर 50 रोल्स रॉयस, 1000 कोटीच्या हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर, भारताचे पहिले अब्जाधीश कोण होते?