मुंबई : यंदाच्या आर्थिक वर्षातला नवा महिना चालू होत आहे. येत्या 1 मे रोजीपासून अनेक गोष्टी बदलणार आहेत. या बदललेल्या नियमांमुळे काही ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसू शकते. 1 मे रोजीपासून गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते बँकेच्या व्यवहारात (Bank New Rules) काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. 


येस बँकेचे नियम बदलणार (Yes Bank New Rules)


येस बँकेने येत्या 1 मे रोजीपासून आपल्या नियमांत काही बदल केले आहेत. प्रो मॅक्स खाते असणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात कमीत कमी  50 हजार रुपये ठेवावे लागतील. प्रो प्लस बचत खात्यात कमीत कमी 25 हजार रुपये ठेवावे लागतील. प्रो बचत खात्यात कमीत कमी 10 हजार रुपये ठेवावे लागतील. एलिमेंट डेबिट कार्डसाठी प्रतिवर्षी 299 रुपयांचे शुल्क द्यावे लागले. एंगेज कार्डसाठी 399, एक्सप्लोअर डेबिड टार्डसाठी 599, रुपे डेबिट कार्डसाठी (शेतकऱ्यांचे खाते) वर्षाला 149 रुपये द्यावे लागतील.


आयडीएफसी फस्ट बँकेनेही बदलले नियम (IDFC Bank New Rules)


आयडीएफसी फस्ट बँकेनेदेखील आपल्या काही नियमांत बदल केले आहेत. या बँकेच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही बील देणं महागणार आहे. फोन बील, वीजबील, इंटरनेट बील, केबल सर्व्हिस, पाणीबील आदी बील तुम्ही क्रेडिट कार्डने देत असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल.  फस्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड, एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड यासाठी मात्र हा नियम लागू नसेल. 


आयसीआयसीआय बँकेचे नवे नियम काय? (ICICI Bank New Rules)


आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या सेवाशुल्कात बदल केला आहे. या बँकेच्या नव्या नियमानुसार डेबिट कार्डसाठी शहरी ग्राहकांना प्रतिवर्ष 200 रुपये तर ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रतिवर्षी 99 रुपये द्यावे लागणार आहेत. एक मे रोजीपासून पासबुकच्या सेवेसाठीही काही शुल्क द्यावे लागेल. चेब बुकचे पहिले 25 चेक हे निशुक्ल असतील. मात्र त्यानंतर प्रत्येक चेकसाठी चार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. डिमांड ड्राफ्ट किंवा पीओ रद्द झाल्यास 100 रुपये तर आयएमपीएसच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार केल्यास 1,000 रुपये ट्रान्सफर केल्यावर प्रत्येक ट्रान्झिशनसाठी 2.50 रुपये द्यावे लागणार आहेत. 


एचडीएफसी बँकेचा नियम बदलला (HDFC Bank New Rules)


एचडीएफसी बँकेच्याही काही नियमांत बदल झाले आहेत. ही खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक आहे. या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडी योजनेत गुंतवणुकीची तारीख वाढवली आहे. या योजनेत 10 मे 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेची सुरुवात मे 2020 मध्ये झाली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दिले जाते. 


गॅस सिलिंडरचा दर बदलणार का? (Gas Cylinder New Rate)


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतात. त्यामुळे एक मे पासून सिलिंडरचा भाव बदलू शकतो. मात्र सध्या देशात लोकसभेची निवडणूक चालू आहे. त्यामुळे हा भाव बदलणार का? याबाबत साशकंता व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा :


आता शेतकरीही होऊ शकतात करोडपती, फक्त करावी लागेल 'ही' शेती; जाणून घ्या सविस्तर


ना बिल्डरची मदत, ना बँकेचे कर्ज, लोकांनीच उभी केली 23 मजली इमारत, मुलुंडमधील पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा!


शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!