Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर, पाण्याची आवक मात्र घटली; पाहा आजची आकडेवारी?
Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे.
Jayakwadi Dam Water Level : सुरवातीपासून दडी मारलेल्या पावसाने शेवटच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सुद्धा पाण्याची आवक सुरु असून, पाणीपातळी वाढतांना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणात आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा असून, 7 हजार 749 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. विशेष म्हणजे 23 सप्टेंबरला 19 हजार क्युसेकने सुरु असलेली पाण्याची आवक आता घटून, 7 हजारांवर आली आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरण देखील तीन वर्षांपासून पूर्णपणे भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. कारण सुरवातीलच मान्सून उशिरा दाखल झाले. त्यात जून महिना कोरडा गेला. जुलैत काही प्रमाणात पाऊस झाला आणि पुन्हा ऑगस्ट देखील कोरडाच गेला. त्यात सप्टेंबर महिन्यात 20 तारखेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, जायकवाडीत देखील आवक सुरु झाली आहे. मात्र, असे असले तरी अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, विभागातील अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही काही गावांना पिण्यासाठी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.
जायकवाडी धरणाची आजची आकडेवारी (01 ऑक्टोबर 2023)
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1510.28 फूट
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 460.333 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1719 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 980.894 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 45.18 टक्के
- जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 7749
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.545
- उजवा कालवा विसर्ग : 00 क्युसेक
- डावा कालवा विसर्ग : 00 क्युसेक
यंदा जायकवाडी धरण भरण्याची शक्यता कमीच?
मागील तीन वर्षांपासून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा आणि उद्योजकांच्या पाण्याच्या प्रश्न मिटल्याचे पाहायला मिळायचे. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जायकवाडी धरणात सुद्धा पाण्याची विशेष आवक झाली नाही. त्यामुळे, धरणात सध्या आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा असून, 7 हजार 749 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्या तारखेत जायकवाडी धरणात 99.45 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा ही टक्केवारी 50 पर्यंत देखील पोहचू शकली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या: