एक्स्प्लोर

मोठी बातमी! इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; याचिका फेटाळली, काय आहे प्रकरण?

Supreme Court Order : आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Supreme Court Order : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे प्रकरण? 

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याच काळात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. 

या निर्णयाच्या विरोधात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला देखील इंदुरीकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने देखील औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे. 

काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशा वेळेला झाला तर अपत्ये रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वॉलिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Indurikar Maharaj : गुन्हा दाखल होण्यापासून इंदुरीकर महाराज यांना औरंगाबाद खंडपीठाचा तात्पुरता दिलासा

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget