एक्स्प्लोर

Maratha Reservation : सरकारच्या 'टाईम बॉन्ड'चाही 'टाईम' हुकणार; शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आज येणार नाही?

Maratha Reservation : जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाचा आजच्या भेटीचा मुहूर्त हुकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची आणखी मुदत दिली आहे. दरम्यान, उपोषण सोडल्यावर जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, असे असतांना देखील सरकारसोबत त्यांची चर्चा सुरूच आहे. यापूर्वी शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन, त्यांना जीआरची कॉपी दिली होती. तर, आज पुन्हा सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार होते. यावेळी या शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्डबाबतचा अहवाल सादर करण्याची शक्यता होती. मात्र, आता शिष्टमंडळ आज ऐवजी उद्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाचा आजच्या भेटीचा मुहूर्त हुकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नव्हता. त्यामुळे मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरु केले होते. त्यानंतर सरकराचं शिष्टमंडळ आणि माजी न्यायमूर्ती यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आणखी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी सरकारच्या वतीने टाईम बॉन्डबाबत देण्याचं देखील ठरले होते. त्यानुसार, हा टाईम बॉन्ड देण्यासाठी आज सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. मात्र, आजचा हा दौरा उद्यावर जाण्याची शक्यता आहे. पण अचानक हा दौरा रद्द का झाला? याबाबत कळू शकले नाही. 

काय आहे टाईम बॉन्डमध्ये? 

मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांनी मध्यस्थी केली होती. तसेच याचवेळी सरकारचे एक शिष्टमंडळ देखील आंतरवाली गावात आले होते. यावेळी, झालेल्या चर्चेत टाईम बॉन्ड देण्याचं देखील ठरले होते. उपोषण मागे घेतांना आरक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, यासाठी सरकार काय-काय करणार, आरक्षणाचा आदेश कधी काढला जाईल, तसेच आरक्षण देतांना याच लाभ कुणाला घेता येईल, याची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा टाईम बॉन्डच्या माध्यमातून देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती आणि सरकराने देखील ते मान्य केले होते. त्यानुसार हा  टाईम बॉन्ड असण्याची शक्यता आहे. 

जरांगे विरुद्ध भुजबळ वाद पेटला...

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी पहिल्यापासून विरोध केला आहे. तर, आता पुन्हा त्यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नकोच या भूमिकेवर भुजबळ ठाम आहे. तर, भुजबळ यांच्या टीकेला जरांगे यांच्याकडून देखील प्रतिउत्तर दिले जात आहे. आम्ही कोठेही अतिक्रमण करत नसून, आमच्या हक्काचे आरक्षण घेत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ वाद अधिकच पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे; पाठिंबा दर्शवत बागेश्वर धाम बाबांनी थेट कारणंच सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget