एक्स्प्लोर

Ganeshostav : गणेशोत्सवात विना परवानगी वर्गणी गोळा केल्यास होऊ शकते कारवाई; काय आहेत नियम?

Ganeshostav : सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करण्याआधी परवानगी घ्यावी लागते.

औरंगाबाद : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshostav) लगबग पाहायला मिळत असून, अनेक मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अनेकदा सार्वजनिकरीत्या गणपती बसवला जातो. यासाठी परिसरातील किंवा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांकडून वर्गणी जमा करण्यात येते. मात्र, सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय या कार्यालयाकडून रितसर पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी न घेता वर्गणी गोळा केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त यांनी दिली आहे. 

औरंगाबादच्या धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क अन्वये विविध जयंती सण जयंती जसे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती वगैरे या करीता वर्गणी गोळा करण्यासाठी या कार्यालयाततून परवानगी देण्यात येत असते. सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध गणेश मंडळे लोकांकडून उत्सवासाठी देणगी गोळी करीत असतात. अशी देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त या कार्यालयातून परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी परवानगी न घेता देणगी गोळा करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुमच्या मंडळाकडून असे वर्गणी केली जाणार असेल तर अधिकृत परवानगी काढून घ्यावी असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

कशी मिळणार परवानगी? 

देणगी गोळा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क अन्वये धर्मदाय आयुक्त  कार्यालयातून परवानगी घ्यावी. अशाप्रकारची परवानगी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी charity.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर event registration यामध्ये जाऊन आपला अर्ज दाखल करावा. अर्जासोबत दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, मंडळाचा ठराव, दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड इ.), जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, पत्ता पुरावा-लाईट बिलाची झेरॉक्स प्रत, मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास मागील वर्षाचा परवानगी आदेश व हिशोबपत्रक इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना हि कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच ऑफलाईन अर्ज करताना कागदपत्र अर्जासोबत जोडवीत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ganesh Chaturthi 2023 : श्री गणेशाचा जन्म कसा झाला? शीर कुणी शोधलं? यामागची रंजक माहिती जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget