एक्स्प्लोर

विरोधकांकडून आरोप, सरकारकडून सारवासारव; त्यामुळे नांदेड प्रकरणाची सीआयडी चौकशीचं होऊ द्या; संजय शिरसाटांची मागणी

Sanjay Shirsat : नांदेडच्या घटनेवरुन राजकारण करु नका, कारण हा हीन प्रकार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर : नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही मृतांचा तांडव सुरूच असून, आणखी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण देखील तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली असून, नांदेड प्रकरणाची सीआयडी चौकशी (CID Investigation) करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. 

दरम्यान या सर्व प्रकरणावर प्रतिक्रीया देतांना शिरसाट म्हणाले की, "नांदेड जिल्हा रुग्णालयात तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या रुग्णांच्या आणि नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी.  या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील शिरसाट यांनी केली आहे. इतकेच नाही तर या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही" संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.

नांदेडच्या घटनेवरुन राजकारण करु नका, कारण हा हीन प्रकार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य रुग्णालयात गरिबांची मुले जातात. या ठिकाणी व्यवस्थित औषधोपचार केले जात नाहीत. कारण काही दलाल तिथे बसलेले असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. विरोधक सरकारवर आरोप करतात आणि नंतर सरकार सारवासारव करतात, आता हे बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी या प्रकरणांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

आरोप प्रत्यारोप सुरूच...

नांदेड येथील घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी देखील केली. तसेच या घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे आरोप फेटाळून लावत नांदेड घटनेला प्रशासन किंवा सरकार जबाबदार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या रुग्णालयात औषधांची कोणतेही कमी नसल्याचे देखील शिंदे म्हणाले आहेत. त्यातच आता उद्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded Hospital Death : नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 6 रुग्णांचा मृत्यू, दोन नवजात बालकांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget