एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... दोन सख्या भावांचा जागेवर जीव गेला; छत्रपती संभाजीनगरात वीज पडून 4 जणांचा मृत्यू

बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी बहुतांश ठिकाणी दिवसभर दमट वातावरण होते

Chhatrapati Sambhajinagar:  मराठवाड्यात आता पावसाचा जोर वाढला असून पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड भागात झालेल्या जोरदार पावसामुळे  शनिवारी दुपारी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन सख्या भावांचा समावेश आहे. शेतात पेरणी करण्यासाठी शिवारात गेले असता अंगावर वीज कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.

वीज कोसळून चार जणांचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील सारोळा गै. गावात शेतात पेरणी करत असताना वीज पडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. मृतांची नावे रोहित काकडे (वय 20) आणि यश काकडे (वय 17) अशी आहेत. ही दोघं भाऊ आपल्या आईसोबत शेतात पेरणीच्या कामात व्यस्त होते. अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार विजांचा कडकडाट सुरू झाला. याच वेळी वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली, आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरी घटना मोढा बू. (ता. सिल्लोड) परिसरात घडली. येथे रंजना बापुराव शिंदे (वय 50) या महिला आपल्या गट क्रमांक 266 मधील शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.तिसरी घटना मौजे पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथे घडली. येथेही वीज पडून शिवाजी सतीश गव्हाणे या युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला

राज्यभरात सध्या पावसाची जोरदार हजेरी लागत असून मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी बहुतांश ठिकाणी दिवसभर दमट वातावरण होते. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागात मुळसधार पाऊस झाला. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनची वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि  काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनचा कहर; अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस, मुंबई, रायगडला आज रेड अलर्ट; पुण्यासह 'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget