एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : कचरा वर्गीकरण न झाल्यास झोन अधिकाऱ्यांचे पगार थांबवले जाणार; संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

Chhatrapati Sambhaji Nagar News : झोनच्या वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचे पगार थांबवले जाणार असल्याचा इशारा आयुक्तांनी बैठकीत दिला. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : प्रत्येक वार्ड अधिकारी यांनी कचरा वर्गीकरणावर लक्ष द्यावे, अन्यथा ज्या झोनकडून वर्गीकरण केलेला कचरा प्राप्त होत नाही अशा झोनच्या वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचे पगार थांबवले जाणार असल्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहे. आज (03 जुलै) रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली. यावेळी बोलताना आयुक्तांनी हा इशारा दिला आहे. 

यावेळी बोलतांना आयुक्त म्हणाले की, ज्या झोनमधून अशा वसाहती जिथे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देत नाही अशा नागरिकांचे प्रबोधन वॉर्ड अधिकारी यांनी करावे. वार्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांनी दररोज कमीत कमी घरांना भेट देऊन ओला आणि सुका कचरा वेगळा देण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करावे. मी स्वतः देखील लोकांमध्ये जाऊन याबाबत समुपदेशन करणार आहे. तर प्रत्येक वार्ड अधिकारी यांनी कचरा वर्गीकरणावर लक्ष द्यावे. ज्या झोनकडून वर्गीकरण केलेला कचरा प्राप्त होत नाही अशा झोनच्या वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचे पगार थांबवले जाणार असल्याचा इशारा देखील आयुक्तांनी बैठकीत दिला. 

अतिक्रमण सर्वेक्षण करण्याच्या सूचना 

याशिवाय शहरातील नाल्यांच्या काठावर अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून एका आठवड्यात अहवाल सादर करावे. तसेच सिडको भागात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण बाबत देखील एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. तसेच इमारत निरीक्षक यांना सहाय्यक पद निर्देशित अधिकारी करावे आणि प्रत्येक झोनमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात यावी. तर महापालिकेतील विविध विभागात अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

विकास योजनेचा पीएलयु दोन महिन्यात सादर करा

शहराची विकास योजनेत आरक्षण टाकताना खेळाचे मैदान, उद्यान, पार्किंग, एसटीपी प्लांट, कचरा प्रोसेसिंग प्लांट, हॉकर्स झोन आणि रुंद रस्ते या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी त्यांनी शहराचे डीपी प्लॅनच्या कामाचा आढावा घेतला. सोबतच या बैठकीत आयुक्तांनी ईएलयु (एक्झिस्टिंग लँड युज) नकाशा बघितला आणि सखोल आढावा घेतला. भविष्यात शासकीय गृह प्रकल्पासाठी देखील जागा आरक्षित करण्याचे निर्देश देखील दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस, 7 वर्षांची चिमुकली वाहून गेली

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget