एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी पुन्हा खैरे,जलील अन् हर्षवर्धन जाधवांच्या नावाची चर्चा; भाजपकडूनही तयारी सुरू

Chhatrapati Sambhaji Nagar News : भाजपकडून देखील संभाजीनगरमध्ये उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असून, यासाठी पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहे. अशातच राज्यातील काही चर्चेतील लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच इच्छुकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ज्यात मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा (Chhatrapati Sambhaji Nagar Distric) देखील समावेश आहे. गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यामुळे यंदाही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण याच मतदारसंघात एमआयएम (MIM) पक्षाचे राज्यातील एकमेव आणि पहिले खासदार म्हणून इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) निवडून आले होते. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील जलील यांच्यासह पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) मैदानात असण्याची शक्यता आहे. सोबतच भाजपकडून देखील संभाजीनगरमध्ये उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असून, यासाठी पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.

कसे असणार चित्र! 

राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये याच संभाजीनगर जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर दोन जण केंद्रीय मंत्री आहेत. एवढेच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचेच आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना-भाजप युतीत ही जागा सेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून (शिंदे गट) रोहियो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर गेल्यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी असल्याने आणि त्यात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून उमेदवार न देण्याचा निर्णय होऊ शकतो. पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे सद्या फक्त अंदाज आणि शक्यता वर्तवली जाऊ शकते.

भाजप- शिवसेनेत जागा कुणाला मिळणार

शिवसेना-भाजप युतीत आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच असायचा. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने सलग चार वेळा या मतदारसंघावर शिवसेनेने विजयाचा भगवा फडकवला होता. परंतु, यावेळी शिवसेनेचे बंडखोरी झाल्याने, दोन्ही शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि भाजपची युती आहे. तर  छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून देखील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे ऐनवेळी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्यावेळी कोणाला किती मतदान

इम्तियाज जलील (एमआयएम- वंचित बहुजन)

मतदान: 389042 (32.47 टक्के)

चंद्रकांत खैरे ( शिवसेना, आत्ताचे ठाकरे गट)

मतदान: 384550 (32.09 टक्के)

हर्षवर्धन जाधव (अपक्ष)

मतदान: 283798 (23.68 टक्के)

सुभाष झांबड (कॉंग्रेस)

मतदान: 91789 (7.66 टक्के)

इतर महत्वाच्या बातम्या: 

Lok Sabha Elections 2024 : विरोधकांना धक्का, भाजपची पहिली मोहीम यशस्वी, 'एनडीए'ला मिळणार बळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget