(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harshvardhan Jadhav : बीआरएसकडून संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांना लोकसभेची उमेदवारी?, बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण
Chhatrapati Sambhaji Nagar : बीआरएसकडून संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभेच्या जागेवरून जोरदार चर्चा सुरु आहे. या जागेवर भाजप आणि शिंदे गट दोघांनी दावा ठोकला आहे. एकीकडे या दोन्ही पक्षात दावे-प्रतिदावे होत असतानाच माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचे (Harshvardhan Jadhav) वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेले होर्डिंग चर्चेचा मुद्दा ठरत आहे. बीआरएस पक्षाचा उल्लेख करत भावी खासदार म्हणून हर्षवर्धन जाधव यांचा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे बीआरएसकडून संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बॅनरवरील राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. भावी मुख्यमंत्र्यानंतर आता भावी खासदार, भावी आमदार या असे यांचे बॅनर देखील बहुतांश ठिकाणी लागत आहे. अशातच राज्याच्या राजकारणात पाय रोवत असलेल्या भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात भावी खासदार हर्षवर्धन जाधव या आशयाचे बॅनर झळकले आहेत. यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव हे लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झालीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेले हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजाराहून अधिक मत घेत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. आगामी लोकसभा निवडणुकीतही ते उभे राहिल्यास लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे दिसेल यात शंका नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीत किंगमेकर
गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापले असतानाच निवडणुका जाहीर झाल्या होत्या. भाजप-शिवसेनेच्या युतीकडून चंद्रकात खैरे, वंचित बहुजन आघाडीकडून (एमआयएम एकत्रित) इम्तियाज जलील आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजाराहून अधिक मत घेत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. त्यामुळे जाधव पुन्हा रिंगणात उतरल्यास गेल्यावेळी सारखेच चित्र राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच यावेळी शिंदे गट किंवा भाजपचा उमेदवार देखील रिंगणात असणार आहे. त्यामुळे जाधव पुन्हा रिंगणात उतरल्यास शिवसेनेला याचा फटका बसण्याचा शक्यता आहे.
होर्डिंग चर्चेचा विषय...
छत्रपती संभाजीनगरचं मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर हर्षवर्धन जाधवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लागले आहे. विशेष म्हणजे यावर बीआरएस पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांचा फोटो आहे. सोबतच जधव यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेलं हा होर्डिंग येणाऱ्या-जाणाऱ्यांचा लक्ष वेधून घेत आहे. तर या होर्डिंगची चर्चा देखील होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
...तर रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालना लोकसभा लढवणार; हर्षवर्धन जाधवांचं वक्तव्य