संभाजीनगर हादरलं! कॉफी कॅफेमध्येच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नको ते फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : पिडीत मुलीला मारहाण करून तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून घेतले. तसेच, या घटनेनंतर आरोपीने तिला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : अभ्यासिकेत ओळख झालेल्या मित्राकडूनच कॉफी कॅफेमध्ये (Coffee Cafe) नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करण्यात आल्याच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर हादरले आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कॉफी कॅफेमध्ये अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून, सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. नितीन वाघ असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई व भावासोबत राहते. तसेच, शहरातील एका पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये ती शिक्षण घेते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या एका मैत्रिणीने नितीन वाघ यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी नितीन वाघ याने तिचा नंबर घेतला. त्यानंतर तो तिला फोन करु लागला. त्याला तिने फोन न करण्याबाबत अनेकदा सांगितले. तरीही तो तिला फोन करायचा. 19 नोव्हेंबर रोजी नितीनने तिला फान करून बीड बायपासवरील साई पॅलेस येथील त्याच्या घरी अभ्यासाला बोलावले. त्यावेळी ती तिची मैत्रिणीसह आणखी एक मित्र नितीनच्या घरी गेले. थोड्यावेळाने नितीनने मुलीला बेडरुममध्ये बोलावून घेतले आणि दरवाजा लावून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करून सुटका करून घेतली. मात्र, बदनामीच्या भितीने तिने याबाबत हॉलमध्ये टिव्ही पाहत बसलेल्या मैत्रीण व मित्राला तसेच घरीही कुणाला सांगितले नाही. यानंतर नितीनने तिची माफी मागितली.
नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केला अत्याचार...
दरम्यान काही दिवसांनी नीतीने तिला फोन करून फिरायला जावू असे सांगून बीड बायपासला बोलावून घेतले. नंतर तिला अंश हॉटेलच्या रुममध्ये नेले आणि सेल्फी काढले. काही वेळाने त्याने तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्यासोबत तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून घेतले. तसेच, या घटनेनंतर नितीनने तिला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, धमकी देत 2 डिसेंबर रोजी तिला उस्मानपुरा येथील रॉयल कॅफेमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पिडीत मुलीनी त्याला फोटो डिलीट करण्याची विनंती देखील केली. या सर्व घटनेनंतर मुलगी तणावाखाली आली.
भाऊ व आईला सर्व हकीकत सांगितली
नितीनकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पिडीत मुलगी सतत झोपून राहू लागली. तिच्या वागण्यातील बदल पाहायला मिळत असल्याने भावाने तिला विश्वासात घेतल्यावर तिने भाऊ व आईला सर्व हकीकत सांगितली. दोघांनी तिला मानसिक आधार दिला. तसेच, 31 डिसेंबर रोजी मुलीने आईसह सातारा पोलीस ठाणे गाठून नितीन वाघ विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी नितीन वाघ याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: