BRS Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची भव्य सभा; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राजकीय घोषणा करणार
BRS Meeting : आगामी काळात मराठवाड्यात 'बीआरएस'च विस्तार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar : तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) भव्य सभा होत आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. तर सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, सभेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सभेतून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राजकीय घोषणा करण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी नांदेड जिल्ह्यात देखील बीसीआरच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात 'बीआरएस'च विस्तार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी केसीआर यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. तर याची सुरुवात महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातून करण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वी नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्यानंतर बीआरएसकडून आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली जात आहे. 'अबकी बार किसान सरकार' या टॅगलाईन खाली 'बीआरएस'कडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या पक्षाला मराठवाड्यात कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मोठ्याप्रमाणावर पक्षप्रवेश...
'बीआरएस' पक्षाने महाराष्ट्रात एंट्री करताच अनेक महत्वाचे राजकीय नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना, माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते संतोष माने, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, फेरोज पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तर आणखी 40 माजी नगरसेवक यांच्यासह माजी आमदार, खासदार बीआरएस पक्षात आज दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पार्किंगसाठी अशी व्यवस्था
पोलिसांकडून पार्किंगची माहिती
- बायपास रोडवरील जबिंदा मैदानात होणाऱ्या बीआरएसच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पार्किंगची माहिती देण्यात आली आहे. सभेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून व बाहेरील जिल्ह्यातून मोठया प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांचे वाहनांसाठी खालीलप्रमाणे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- सिल्लोड फुलंब्रीकडून येणारे वाहने सांवगी फाटा, कॅनीज नाका, झाल्टा फाटा बीड बायपास मार्गे रेणुका माता कमान (द्वारकादास शामकुमार कपड्याचे शोरुम) समोरील बीड बायपासरोड लगत मैदान व गोदावरी टीच्या दक्षिण बाजूस असलेले चौधरी मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
- जालना आणि बीडकडून येणारे वाहने केंब्रीज नाका, झाल्टा फाटा बीडबाय पास मार्गे रेणुका माता कमान (द्वारकादास शामकुमार कपड्याचे शोरुम) समोरील बीड बाय रोड लगत मैदान व गोदावरी टीच्या दक्षिण बाजूस असलेले चौधरी मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
- अहमदनगर, गंगापुर, वैजापूर, कन्नडकडून येणारे वाहने ए.एस. क्लब, लिंक रोड, महानुभाव चौक, बीड बायपास मार्गे गोदावरी टीच्या दक्षिण बाजूस असलेले चौधरी मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
- खुलताबाद, दौलताबादकडून येणारे वाहने नगरनाका, पंचवटी चौक, रेल्वे स्टेशन चौक, महानुभाव चौक बीड बायपास गोदावरी टीच्या दक्षिण बाजूस असलेले चौधरी मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
- शहरातून येणारे वाहने हे गुरुकुल शाळाचे मैदान, जबिंदा RMC Plant मैदान येथे वाहने पार्किंग करतील.
इतर महत्वाच्या बातम्या: