Chhatrapati Sambhaji Nagar: ठाकरे कुटुंबांनी गाजवलेल्या मैदानावर 'मविआ'ची भव्य सभा; तयारीसाठी संपूर्ण मराठवाड्यात बैठकसत्र
Chhatrapati Sambhaji Nagar : आतापर्यंत ठाकरे कुटुंबांनी गाजवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, याची सुरुवात मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) होणार आहे. तर या सभेचे यजमानपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे 2 तारखेला होणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठवाडाभर बैठकांचे सत्र चालविले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ठाकरे कुटुंबांनी गाजवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला असून, या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते या सभेच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. तर या सभेची महत्वाची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. खैरे आणि दानवे यांच्याकडून मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात यासाठी बैठक देखील घेण्यात येत आहे. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमवण्यासाठी मराठवाडभरातून कार्यकर्ते सभेसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला...
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षातील महत्वाचे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सभा घेणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात होणाऱ्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती असणार आहे. तर या सभेची जबाबदारी देखील ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे, त्या मैदानात सभा घेण्यासाठी सहसा इतर पक्ष धाडस करत नाही. शहरातील सर्वात मोठे मैदान असलेल्या या मैदानात आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा गाजल्या आहेत. त्यामुळे आता 2 एप्रिला होणारी सभा देखील यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पहिल्यांदाच एकत्रित मोठी सभा...
शिंदे-फडणवीस एकत्र आल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळले. त्यामुळे राज्यात नव्याने नवीन सरकार आले. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर रपहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची एकत्रित भव्य सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणूकीच्या दृष्टीने देखील ही सभा महत्वाची समजली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी राजकीय बातमी! रावसाहेब दानवेंचे कट्टर विरोधक हर्षवर्धन जाधवांचा BRS मध्ये प्रवेश