एक्स्प्लोर

पाळणा हलला! संभाजीनगरमधील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ‘समृद्धी’ने दिला बछड्यास जन्म

Aurangabad News : आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान समृद्धी वाघिणीने एका बछड्यास जन्म दिला आहे.

Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Zoo Aurangabad) ‘समृद्धी’ वाघीण (Tigress) चौथ्यांदा आई बनली आहे. तीन वर्षांपूर्वी समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर आता समृद्धी पुन्हा गर्भवती होती. दरम्यान आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास तिने जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, मागील 28 वर्षांत या उद्यानात 40 वाघांचा जन्म झाला आहे. आता ही संख्या 41 वर पोहचली आहे. 

मनपा प्राणीसंग्रहालयातील पिवळे वाघ समृद्धी हीने आज (19 जुलै) रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास जन्म दिलेला आहे. समृद्धी वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसून आले आहे. वाघीण स्वतः बछड्याची निगा आणि काळजी घेत आहे. तसेच वाघिणीच्या, बछड्याच्या 24 तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशी माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

चौथ्यांदा बनली आई...

सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीने प्रथम वेळी 12 नोव्हेंबर 2016  रोजी तीन पिवळे, एक पांढरा बछड्यास जन्म दिला होता. दुसऱ्या वेळी 16 एप्रिल 2019  रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता, ज्यात दोन पिवळे तर दोन पांढरे होते. तिसऱ्या वेळी 25 डिसेंबर 2020  रोजी पाच पिवळ्या बछड्यांना जन्म दिला होते. त्यानंतर आता तीन वर्षांनी आज 19 जुलै 2023 रोजी चौथ्यावेळी एका बछड्यास जन्म दिला आहे. तर आतापर्यंत जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे वाघ मादी हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. इतर वाघ प्राणीसंग्रहालयातच आहेत अशी माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी ,छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.

उद्यानात सध्या 10 वाघ  

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या 10 वाघ आहेत. त्यांतील सहा मादी तर चार नर आहेत. देशात वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर मनपावर वाघांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. वाघांना योग्य वातावरण मिळणाऱ्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील 28 वर्षांत 40 वाघांचा जन्म झाला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वाघ हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. 

इतर संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget