एक्स्प्लोर

उर्वरित कांदा अमित शाहांच्या घरी पाठवायचा का?; निर्यात बंदीवरून अंबादास दानवेंची टीका

Ambadas Danve : एवढ्या प्रमाणात कांदा उत्पादित झाल्याने फक्त 3 लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : देशात सर्वात जास्त कांद्याचे पीक महाराष्ट्रात (Maharashtra) घेतले जाते. एकट्या महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांदा (Onion) उत्पादित होतो. त्यामुळे फक्त 03 लाख टनांची निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने निव्वळ व्यापाऱ्यांना फायदा पोहचवला असून, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा निर्यातीवरील बंदी सरसकट उठवा अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज आपल्या सोशल मीडियावर (Social Media)  पोस्ट करत केली आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. एवढ्या प्रमाणात कांदा उत्पादित झाल्याने फक्त 3 लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित कांदा सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्री यांच्या घरात पाठवायचा का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

अंबादास दानवेंच्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांदा कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण 13 लाख टन कांदा देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या 12 ते 17 लाख टन कांद्यापैकी फक्त 3 लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या घरी पाठवायचा का?, शेतकऱ्यांची कांदा विक्री अटोपत आलेली आहे. असे असताना निर्यातीचा निर्णय निव्वळ व्यापाऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही. बंदी सरसकटच उठवायला हवी, अशी अंबादास दानवे यांनी मागणी केली आहे.

3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीची मान्यता

काल रविवार (18 रोजी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. तसेच या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली होती.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Onion Export : निर्यात बंदी उठवल्याने कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांना दिलासा, कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी खुली करण्याची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Embed widget