एक्स्प्लोर

मोठी बातमी! अजित पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर, मराठा आंदोलक आक्रमक

Ajit Pawar : राजकीय मंडळीना संमेलनाच्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (Marathwada Sahitya Sammelan) उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. याबाबत, गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन देखील दिले आहे. ज्यात,"शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत. तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे निवेदनात?

आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्या ठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतः चा प्रचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आसताना शासनाने अजून ही मराठा समाजाला obc मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये अशी घोषणा केली असताना संत परंपरेत ज्ञानेश्वर रचिला पाया, तुका झालासे कळस असे उत्तुंग साहित्य परंपरा प्रचार जे संत महंत मंडळी रात्रंदिवस करतात त्यांना बोलावणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता कोणीतरी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून प्रचारासाठी साहित्य संमेलनाच्या वापर करत असेल तर आमचा सकल मराठा समाजाचा यास विरोध असून, शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाजीनगर जिल्हा दौरा

  • शनिवार (2 डिसेंबर) रोजी सकाळी 9. 50मि. नी. हेलिकॉप्टरने पारख मैदान हेलिपॅड, लासूर रोड, गंगापूर येथे आगमन
  • सकाळी 10 वा. साबणे फर्निचर मॉल येथे सदिच्छा भेट
  • सकाळी साडेदहा वा. गजान मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड आयसीयु गंगापूर येथे सदिच्छा भेट
  • सकाळी 10. 55 मि. नी. कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगर, श्रीमुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.
  • दुपारी 1 ते 2.15 वा. पर्यंत राखीव.
  • दुपारी 2.45 वाजता तहसिल कार्यालय, गंगापूर येथे आगमन व छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय आढावा बैठक
  • दुपारी 4.15  वाजता पत्रकार परिषद
  • सायंकाळी 4.45  हेलिपॅडकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने  पुणेकडे प्रयाण.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange Patil : काही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, तो जातीवाद करतोय, भुजबळांचा एकरी उल्लेख करत जरांगे पाटील पुन्हा बरसले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
Embed widget