Chhagan bhujbal: ओबीसी आरक्षणासाठी 15 जणांनी आत्महत्या केल्या, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय; छगन भुजबळ कडाडले
Chhagan Bhujbal : ओबीसी जात नाही तर प्रवर्ग आहे. मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ मिळेल, नाही ओबीसींना अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal: राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे कुठल्या कारणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भेटले आणि काय निरोप घेऊन गेले, हे मला माहिती नाही. GR निघाल्यावर काल आजून काही आत्महत्या झाल्या आहेत. आतापर्यंत 14 ते 15 आत्महत्या झाल्या आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागला आहे, हे लोकांचे ठाम मत झाले आहे. मागासवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी एक जात नाही, एक मोठा समाज आहे. ओबीसी जात नाही तर प्रवर्ग आहे. मात्र मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ मिळेल, नाही ओबीसींना अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
Chhagan Bhujbal:आरक्षणासाठी 15 जणांनी आत्महत्या केल्या, तोंड दाबून मार सहन करावा लागतोय
तुम्ही जास्त लोक चुकीच्या मार्गाने भरले तर मग धक्का कसा लागणार नाही? मनोज जारांगे माझ्या बद्दल चुकीचे बोलतात आणि चुकीचे शब्द वापरतात म्हणून मी बोलतो. हाके आणि वाघमारे यांच्यावर हल्ला झाला. आम्ही असे वागत नाहीये, आम्ही सरकारला सांगतोय, आमचा समाज गरीब आहे आणि राजकीय ताकत आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्ही तोंड दाबून लाथाबुक्क्याचा मार खात आहोत. इतर ओबीसी नेते का पुढे येत नाहीत? मला माहिती नाही पण मी लढत आहे. असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
Chhagan Bhujbal On Nagpur OBC Morcha : सगळ्याच ठिकाणी मला जाता येणार नाही
बीडचा मोर्चा महात्मा फुले समता परिषद आयोजित केलेला हा मोर्चा आहे. आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट करणार नाही आणि आतापर्यंत आम्ही ते केलेलंही नाही. सोकॉल्ड नेत्या विरोध आमची ही सभा आहे. नागपुरात आज ओबीसी मोर्चा आहे. मात्र सगळ्या ठिकाणी मला जाता येणार नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात ते बोलतात आणि ते विरोधी पक्षाचे नेते आहेत ते बोलणारच असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
Nagpur OBC Protest: ओबीसींचा आज नागपुरात महामोर्चा
ओबीसी समाजाकडून नागपुरात आज एक मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. 2002 साली बनलेल्या हैद्राबाद गॅझेटियर (Hyderabad Gazetteer) आणि मराठा गॅझेटियर (Maratha Reservation) संदर्भातला GR रद्द करण्यात यावा, ही या मोर्चाची मुख्य मागणी आहे. हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होऊन सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतर कापून संविधान चौकपर्यंत पोहोचेल. संविधान चौक येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या मोर्चामध्ये विविध OBC संघटनांचे प्रतिनिधी आणि विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हजारो OBC बांधव सहभागी होत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी विशेष पुढाकार घेतला असला तरी, हा मोर्चा OBC समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या मोर्चातून OBC समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी वाचा
























