Chennai : बॉस असावा तर असा! आयटी कर्मचाऱ्यांना वाटल्या 50 नव्या गाड्या
Chennai : आपली कंपनी (Company) पुढे जावी, कंपनी आर्थिकदृष्ट्या विकसित व्हावी, यासाठी कर्मचारी सातत्याने झटत असतात. दरम्यान अशा कर्मचाऱ्यांना (employee) काही ठिकाणी मोबदला मिळतो. बॉसकडून पाठीवर थापही मारली जाते.
Chennai : आपली कंपनी (Company) पुढे जावी, कंपनी आर्थिकदृष्ट्या विकसित व्हावी, यासाठी कर्मचारी सातत्याने झटत असतात. दरम्यान अशा कर्मचाऱ्यांना (employee) काही ठिकाणी मोबदला मिळतो. बॉसकडून पाठीवर थापही मारली जाते. दरम्यान, चेन्नईतील (Chennai) एका आयटी कंपनीने (IT Company) कर्मचाऱ्यांना चक्क 50 नव्या गाड्या वाटल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुखद धक्काच बसलाय. शिवाय अनेक लोकांकडून गाड्या गिफ्ट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना गिफ्ट (Gift) दिल्याची ही पहिलीच बातमी नाही. यापूर्वी काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अशा प्रकराची गिफ्ट दिली आहेत.
बहुसंख्य कर्मचाऱ्यांकडे नव्हती गाडी
चेन्नईतील (Chennai) या कंपनीच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांकडे गाडी नव्हती. कंपनीने दिलेल्या गिफ्टमुळे एकप्रकारे त्यांची गाडी घेण्याची इच्छाच पूर्ण झाली आहे. तामिळनाडू येथील राहिवासी मुरली (Murali) यांनी 2009 मध्ये आपल्या पत्नीच्या साथीने Ideas2IT टेक्नॉलॉजी सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एका कंपनीची स्थापना केली होती. कंपनीची स्थापना केल्यानंतर अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या. त्याला मुरली आणि त्यांच्या पत्नीने तोंड दिली.
कर्मचाऱ्यांमुळेच कंपनीची प्रगती; आयटी कंपनीच्या मालकाची भावना
"सुरुवातीला जेव्हा कंपनीने मोठा आर्थिक नफा मिळवलेला नव्हता. व्यवसाय वाढायला अनेक वर्षे लागली. या कालावधीत या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वाढीसाठी मोठी साथ दिली. दरम्यान, आता कंपनीने मोठा नफा कमावला. मोठी प्रगती केली. कंपनी उभी राहण्यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांना नव्या 50 गाड्या वाटण्यात आल्या आहेत", अशी भावना आयटी कंपनीच्या मालकांनी व्यक्त केली आहे. आयटी कंपनीचे बॉस (Murali) आणि त्यांच्या पत्नी कर्मचाऱ्यांना नव्या गाड्या वाटतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
कोणत्या गाड्या वाटण्यात आल्या?
आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एकूण 100 गाड्या वाटण्यात आल्या. यामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट डिजायर, ब्रेझा आणि अर्टिगा या गाड्यांचा समावेश आहे. मुरली यांनी आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना 100 गाड्या वाटल्या आहेत. कंपनीचे मालक (Murali) म्हणाले, माझ्याकडे आणि पत्नीकडे कंपनीचे सर्व शेअर्स आहेत. 33 टक्के शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. आम्ही वेल्थ प्लॅनिंग केले होते. त्यानंतरच या 50 गाड्या कर्मचाऱ्यांना वाटण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या