(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! चंद्रपुरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
राज्यातील बहुतांश ठिकाणचं तापमान (Temperature) हे 38 ते 40 अंशाच्या दरम्यान आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे.
Chandrapur Weather : सध्या राज्यात उन्हाचा (Heat) चटका वाढलाय. वाढत्या उन्हामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. राज्यातील बहुतांश ठिकाणचं तापमान (Temperature) हे 38 ते 40 अंशाच्या दरम्यान आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं चंद्रपूरसाठी (Chandrapur) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भात अधिक उष्णता
राज्याच्या विविध भागात सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलीय. विशेषत: विदर्भात अधिक उष्णता जाणवत आहे. अशातच चंद्रपुरात दिवसा आणि रात्री देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं नागरिकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असं आवाहनं प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्माघाताची स्थिती जर निर्माण झाली तर रुग्णवाहिका बोलावण्यास 108 क्रमांक देण्यात आलाय. तसेच 12 ते 3 या वेळात ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
उद्यापासून कसं असणार हवामान?
दरम्यान, राज्यात सध्या जरी उष्णतेची लाट असली तरी उद्यापासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलीय. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळ यांनी दिली आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं ढगाळ वातावरण राहून जर काही ठिकाणी थोडा पाऊस पडला तरी उष्णता कमी होईल, त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळेत. उद्यापासून गुढीपाडव्यापर्यंत हवामानत बदल होणार असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
कुठं ढगाळ तर कुठं पावसाची शक्यता, गुढीपाडव्यापर्यंत कसं असेल महाराष्ट्रातील हवामान?