Chandrashekhar Bawankule : दुबार मतदार यादी ही 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule On Voter List : दुबार मतदार हा अॅडिशन आणि डिलिशनचा विषय आहे, पण मुंबईत काढण्यात आलेला मोर्चा हा खोटारड्या लोकांचा असल्याचं मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

चंद्रपूर : मतदार यादीत मोठा घोळ (Bogus Voter List) असून त्या माध्यमातून मतचोरी झाल्याचा आरोप करत मनसे आणि महाविकास आघाडीने मुंबईत मोठा मोर्चा (Mumbai Morcha) काढला. या मोर्चावर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली. दुबार मतदारयादीचा विषय हा गेल्या 25 वर्षांपासूनचा आहे, संपूर्ण यादी स्क्रॅप होणार नाही तोपर्यंत दुबार मतदान कमी होणार नाही. पुढच्या काळात घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली पाहिजे असं ते म्हणाले.
लोकसभेच्या यादीवरच विधानसभा निवडणुका होतात आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात. मात्र महाविकास आघाडीला माहीत आहे की त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी केलेली ही धडपड आहे असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
Chandrashekhar Bawankule On Voter List : संपूर्ण यादी स्क्रॅप करावी लागेल
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "दुबार तिबार मतदारांवर भाजपचे देखील ऑब्जेक्शन आहे. यावर सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळात घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली पाहिजे. दुबार मतदार यादी ही आजपासून नाही, तर गेल्या 25 वर्षांपासून आहे. दुबार मतदार यादीवर तुमची लोकसभा झाली, तुमची विधानसभा झाली. जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होणार नाही तोपर्यंत दुबार मतदार कमी होणार नाही. अॅडिशन आणि डिलिशनचा विषय वेगळा आहे. मात्र हा मोर्चा खोटारड्या लोकांचा आह. या लोकांचा पुन्हा पराभव होईल. त्यावेळी पराभव मतदार यादीमुळेच झाला हे सांगण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला होता."
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी तक्रार करावी
आपल्या नावाने ऑनलाईन पद्धतीने खोटा अर्ज करून कुटुंबातील नावे रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,
उद्धव ठाकरे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. भाषणामध्ये खोटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभेमध्ये जो खोटारडेपणा केला तोच प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत काँग्रेसचे 31 खासदार ज्या मतदार यादीवर निवडून आले, तीच ही मतदार यादी आहे. लोकसभेत विजय झाला तर यादी चांगली होती, विधानसभेत पराभव झाला तर मतदार यादी खराब झाली का?
आता महाविकास आघाडीचा चांदा ते बांदा पुन्हा एकदा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवासाठी लागणारे कारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी शोधत आहे असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
ही बातमी वाचा:
























