Chandrapur : रजेवर आलेला जवान बनला देवदूत, जीवाची बाजी लावून वाचवले पाच जणांचे प्राण
Chandrapur News Update : चंद्रपूर जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. भद्रावती तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या प्रवाशांना जवानाने आणि गावकऱ्यांनी वाचले आहे.
![Chandrapur : रजेवर आलेला जवान बनला देवदूत, जीवाची बाजी लावून वाचवले पाच जणांचे प्राण Chandrapur News Update auto drown in brook soldiers saved 5 people life in Chandrapur Chandrapur : रजेवर आलेला जवान बनला देवदूत, जीवाची बाजी लावून वाचवले पाच जणांचे प्राण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/0b572818d65861eb726853154db511681657446585_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrapur News Update : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या प्रवाशांना जवानाने आणि गावकऱ्यांनी वाचले. निखिल काळे असे या देवदूत बनून आलेल्या जवानाचे नाव आहे.
चंद्रपूर जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील टाकळी गावत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे ओसांडून वाहणाऱ्या नाल्यावरील पूल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. या ऑटोमध्ये पाच प्रवाशी होते. पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असल्यामुळे मदतीसाठी प्रवाशी आरडाओरडा करू लागले.
पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्याचे धाडस केले नाही. यावेळी गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सध्या सुटीवर गावात आलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबविले. निखिल काळे आणि स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका झाली. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या या जवानाने रजेवर असताना देखील आपले कर्तव बजावले. निखिल काळे या सैनिकाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. वाहनचालकाने टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात हलगर्जीपणाने गाडी घातल्यामुळे ही घटना घडली. परंतु, निखिल काळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गाडीतील सर्व प्रवाशांना वाचवले.
मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील काही भागात पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये नाल्यातील पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार, राधानगरी धरण निम्मे भरले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)