एक्स्प्लोर

Chandrapur Crime News: अल्पवयीन मुलांना जास्त शिक्षा होत नसल्याचं हेरलं, खून करण्यासाठी इंटरनेटची मदत, सिगारेट दिली नाही म्हणून पहाटे गेला अन् ...

Chandrapur Crime News: उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केल्याचं निष्पन्न

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका महिलेचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. धक्कादायक म्हणजे खून करणारा हा त्याच परिसरात राहणारा 17 वर्षीय अल्पवयीन तरुण आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे कविता रायपूरे या 55 वर्षीय महिलेचा घरी एकटी असतानाच 15 जूनला धारदार शस्त्राने खून करण्यात आला. घटना घडली तेव्हा सुरक्षारक्षक असलेला त्यांचा मुलगा कामावर गेला होता आणि त्या घरी एकट्याच होत्या. घराच्या शेजारील राहणारी त्यांची विवाहित मुलगी सकाळी घरी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी संपत्ती, वैयक्तिक वाद किंवा इतर काही कारणांमुळे हा खून झाला का याबाबतचे तपशील गोळा करत तब्बल 40 ते 50 लोकांची चौकशी केली.

तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेच्या घराजवळील एक तरुण बाहेर गावी गेल्याचं आढळून आलं आणि त्यांनी संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेत चौकशी केली आणि चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. मयत कविता रायपुरे यांच्या घरीच छोटं किराणा दुकान आहे. आरोपीची जवळपास एक हजार रुपये उधारी असल्याने मयत महिलेने आधीची उधारी दिल्याशिवाय सिगरेट देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने पहाटेच्या सुमारास कोयत्याने डोक्यामध्ये वार करून खून केला. विशेष म्हणजे कविता रायपूरे यांचा खून करण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलाने शांतपणे योजना आखली. 

इंटरनेट वरून माहिती गोळा केली

अल्पवयीन आरोपीने खून करण्यासाठी इंटरनेट वरून माहिती गोळा केली. त्यातही आपण अल्पवयीन असल्याने आपल्याला फार शिक्षा होणार नाही याची देखील त्याने माहिती मिळवली होती अशी माहिती समोर आली होती. पळून जाण्यासाठी हुबळीच्या प्रवासाचा बेत आखला आणि तिकिटं देखील काढून ठेवली. स्वतःच्या मोबाईल मधून ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट केली आणि त्यानंतर त्याने थंड डोक्याने खून केला आणि हुबळीला निघून गेला,पोलिस तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महिलेच्या हत्येप्रकरणी राजुरा पोलिसांनी 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे आणि बालसुधार गृहात त्याची रवानगी केली आहे. मात्र या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांवर मनावर इंटरनेटमुळे बिंबवल्या जात असलेल्या विकृत गोष्टी कुठल्या थराला जात आहे हे अधोरेखित केलं आहे.

नेमकं घडलं काय ?

चंद्रपूर शहरातील राजुरामध्ये 15 जून रोजी एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती . आता पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा झाला असून संपूर्ण शहर हादरले आहे . राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार करत महिलेचा खून केल्याचं समोर आला आहे . कविता रायपुरे (53) असे मृत महिलेचे नाव आहे .

कविता रायपुरे यांचे रमाबाई नगर येथे किराणा दुकान होते .घटनेच्या दिवशी एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या दुकानात आला . मुलाने महिलेकडे सिगारेट उधारीवर मागितली .मुलाकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला .उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग मनात ठेवून रात्री 12 ते 1च्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहत आरोपी अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी  मारत आत शिरला . महिलेच्या घरात शिरून धारदार शस्त्राने वार करत कविता रायपुरे या महिलेला ठार केले .महिलेला तिथेच सोडून आरोपी मुलगा फरार झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?

व्हिडीओ

Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच
Pune Crime News : चोरट्यांनी चक्क 'Virtual Court' भरवलं! पुण्यात निवृत्त वृद्धाची १० कोटींची फसवणूक
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Embed widget