एक्स्प्लोर

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एलव्हीबी आणि डीबीआयएलच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता एका निश्चित तारखेपासून या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढता येणे शक्य होईल.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लक्ष्मी विलास बँक (एलव्हीबी) आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या (डीबीआयएल) विलिनीकरण योजनेला मान्यता देण्यात आली. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आर्थिक तसेच बँकिंग स्थिरतेसाठी बँकिंग नियामक कायदा, 1949 मधील कलम 45 अनुसार 17 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अर्जानुसार एलव्हीबीला 30 दिवसांचा अधिस्थगन कार्यकाल देण्यात आला आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने सरकारबरोबर सल्ला मसलत करून एलव्हीबीचे संचालक मंडळ बरखास्त करून ठेवीदारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

बँकेचे भागधारक आणि इतर संबंधित सहभागीदार, जनता यांच्याकडून आलेल्या सूचना तसेच त्यांनी घेतलेल्या हरकती यांचा विचार करून रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाची तयारी केली आणि अधिस्थगन कालावधी संपण्यापूर्वीच सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला. या अधिस्थगन कालावधीमुळे एलव्हीबीच्या खातेदारांना बँकेतून रक्कम काढण्यासाठी असलेले निर्बंध शक्य तितक्या लवकर हटवण्याच्या उद्देशाने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एलव्हीबी आणि डीबीआयएलच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता एका निश्चित तारखेपासून या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढता येणे शक्य होईल. यापुढे खात्यातून पैसे काढण्यावर बंधने घालण्यात येणार नाहीत.

डीबीआयएल या बँकिंग कंपनीला रिझर्व्ह बँकेचा परवाना आहे. डीबीआयएलचा ताळेबंद चांगला असून सहाय्यक स्वरूपात कार्य करणारी कंपनी आहे. तसेच कंपनीला भांडवलाचा आधार चांगला आहे. अशियातल्या अग्रगण्य वित्तीय सेवा समूहातल्या डीबीएसचे पालकत्व लाभले असल्यामुळे, त्याचा फायदा डीबीआयएलला नेहमीच झाला आहे. सिंगापूर मुख्यालय आणि तिथल्या भांडवली बाजारामध्ये डीबाआयएल सूचीबद्ध असून 18 बाजारपेठेत कार्यरत आहे. या विलिनीकरणानंतरही डीबीआयएलचा ताळेबंद भक्कम राहणार असून आता एलव्हीबीच्या शाखांची त्यामध्ये भर पडणार असल्याने डीबीआयएलची शाखा संख्या 600 पर्यंत पोहोचणार आहे.

एलव्हीबीचे विलिनीकरण जितके लवकर होईल, तितका लाभ या बँकेवर असलेला ऋणताण कमी करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर ठेवीदार आणि आर्थिक व्यवस्थेचे रक्षण करता येणार आहे. सरकार स्वच्छ बँकिंग कार्यप्रणाली प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे, त्यानुसार एलव्हीबीच्या विलिनीकरणाला विनाविलंब मान्यता देण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरPravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget