एक्स्प्लोर

...अन्यथा गणेशोत्सव काळात मोठं आंदोलन छेडणार, एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा

Buldhana News : येत्या ०३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा देण्यात आला आहे.

बुलढाणा : येत्या ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन (ST Workers Strike) करण्याच्या तयारीत आहेत. राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा देण्यात आला असून एस. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास गणेशोत्सवकाळात (Ganeshotsav 2024) प्रवाशांचे होणार हाल होणार असल्याचे चित्र आहे. 

राज्यातील एसटी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीची आज बुलढाणा (Buldhana News) येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं. या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन इशारा देण्यात आला आहे. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होत आहे. मात्र या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचा मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

...अन्यथा 3 सप्टेंबरपासून मोठं आंदोलन छेडणार 

कृती समितीच्या पदाधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे. या स्थितीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कृती तुम्ही समिती तयार झाली आणि 2016 पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा आम्हाला आश्वासन दिले. परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

कृती समितीच्या माध्यमातून आक्रोश 

तसेच, मागील काळात महामंडळ आर्थिक संकटात होते. आता आर्थिक संकटातून बाहेर पडलेले असताना गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचा करार प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने विविध पातळीवर मागण्या करण्यात आल्या. परंतु, मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता. म्हणून कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृती समिती तयार झाली आहे. त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन झाले. याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यात धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली. तसेच पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजून कुठलीही  कृती समितीच्या माध्यमातून आज राज्यभरात आक्रोश आंदोलन पार पडत आहे. 

आणखी वाचा 

एसटीचा 'ज्येष्ठ' घोटाळा; उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर, ABP Majha ला कंडक्टर्सची कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Embed widget