एक्स्प्लोर

बुलढाण्यातील उंद्री गावाचं नामकरण, गावकऱ्यांच्या 40 वर्षाच्या लढ्याला यश

बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार लोकसंख्या असलेलं 'उंद्री' हे गाव आहे. जालना - खामगाव मार्गावरील हे गाव तसं सर्वधर्मीय वस्ती असलेलं....पिढ्यानपिढ्या गुण्या गोविंदाने राहणार गाव आहे.

बुलढाणा : जिथं देशभर शहर, गावांच्या नामांतराचा मुद्दा जोर धरत आहे. तिथं बुलढाण्यातील एका छोट्याशा गावाच्या नामांतरासाठी गावकाऱ्यांनी दिलेल्या एकजूट लढ्याला तब्बल 40 वर्षानंतर यश मिळालं आहे. या गावाचा नामांतर ही एक चांगल्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर झालं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार लोकसंख्या असलेलं 'उंद्री' हे गाव आहे. जालना - खामगाव मार्गावरील हे गाव तसं सर्वधर्मीय वस्ती असलेलं....पिढ्यानपिढ्या गुण्या गोविंदाने राहणार गाव आहे. पण गावाच्या नावामुळे या गावातील अनेकांना सांगण्यास संकोच वाटत होता. तशी उंद्री ही ग्रामीण भागातील शिवी असल्याचा भाव या गावकाऱ्यांमध्ये होता. म्हणून 1981 साली गावातील तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना एक निनावी पत्र पाठवून आमच्या गावाचं नाव बदलून द्या अशी मागणी केली. विशेष म्हणजे त्या पत्राची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन तात्काळ गावाच्या सरपंचांना पत्र लिहून तसा ठराव मागण्यात आला.

गावाला एक पार्श्वभूमी होती ती म्हणजे 1931 साली देशात सर्वत्र दलित - सवर्ण असा वाद सुरू असताना उंद्री या गावात गावकऱ्यांनी दलित आणि सवर्ण यांच्यात एकोपा घडवून एका विहिरीवर पाणी भरणे , एका कार्यक्रमात जेवण करणे असे उपक्रम सुरू करून दलित सवर्णातील दरी मिटवून एक आदर्श उदय निर्माण केल्याने देशात या गावाचं नाव सगळीकडे चर्चेत येऊ लागलं. एक नवा 'उदय'  या गावाने निर्माण केल्याने गावतील नागरिकांनी आपल्या गावाचं नामकरण उदयनगर व्हावं असा ठराव सरकारकडे पाठविला. पुढे 1989 पासून आजचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी गावाच्या नामकरणाचा पाठपुरावा करून त्याला गेल्या 31 मे रोजी यश मिळालं. आज सरकारने आपल्या गॅझेटमध्ये या गावाचं नामकरण करून ' उदयनगर' असे केलं आहे. 

गेल्या चाळीस वर्षाच्या एका निनावी पत्राने सुरू केलेल्या या नामांतराची कहाणी आज यशस्वीरित्या संपली असल्याने व गावाचं नामांतर झाल्याने गावातील नागरिक आनंदित आहेत. गावातील नागरिकांना आता मी उदयनगर गावचा....! अस सांगण्यात संकोच वाटत नसून गावातील नागरिक अभिमान व्यक्त करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजीRam Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषणMarkadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget