एक्स्प्लोर

Lonar Lake: लोणार सरोवराच्या पाण्यात निर्माण झाली सजीव सृष्टी; पर्यावरणासह मानवलाही धोका?, सरोवराचं अस्तित्वही धोक्यात!

Lonar Lake: यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी  झाली. लोणार शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता, तोही धुळखात पडून आहे.

Lonar Lake: सुमारे पाच लाख 80 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची (Lonar Lake) निर्मिती झाली. बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं जगातील हे एकमेव सरोवर...सरोवरातील पाणी हे अत्यंत अल्कधर्मी असल्याने यातच कधीही इतिहासात सजीव सृष्टी आढळल्याची नोंद नाही. सरोवरातील अल्कधर्मी पाणी असल्यामुळे यात कुठलेही मासे किंवा जीव जंतू जगू शकत नाही. मात्र आता लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने यात सजीव सृष्टी निर्माण होताना दिसत आहे. या सरोवरच चक्क मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.

यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी  झाली. लोणार (Lonar Sarovar) शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता, तोही धुळखात पडून आहे. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळल्या जात असल्याने सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली. त्यामुळे सरोवराच पाणी हे डायल्यूट झाल्याने पाण्याचे गुणधर्म बदलल्याचं बोलल्या जात आहे. सरोवरातील पाणी हे खारट व अल्कधर्मी असल्याने याची पी एच नेहमी साडेदहा ते बाराच्या दरम्यान नोंदवली गेली आहे मात्र यंदा या पाण्याचा खारटपणा कमी होऊन याची पीएच आठ ते नऊ च्या दरम्यान कमी झाली आहे. त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल व जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.

काही स्थानिक व सरोवर अभ्यासकांनी यात पहिल्यांदाच मासे बघितल्याचं म्हटलं आहे. इतिहासात या पाण्यात कधीही मासे किंवा कुठलाही जीव जंतू त्यांनी बघितला नाही व तो जगू शकत नाही असा दावाही सरोवर अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे "एबीपी माझा" ने थेट लोणार सरोवराच्या तळाशी जाऊन पाहणी केली असता यात मोठ्या प्रमाणात मासे आढळून आलेत तर "एबीपी माझा"ने या पाण्याची पीएच तपासली असता ती आठ ते नऊच्या दरम्यान आढळली.

पाण्याचे गुणधर्म तपासतानाचा डेमो- (Maharashtra Lonar Lake)

लोणार सरोवराला लाखो वर्षांचा इतिहास आहे. बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे पडलेले हे जगातील एकमेव सरोवर असल्याने जगभरातील पर्यटक हे सरोवर पाहण्यासाठी लोणार येथे येत असतात. या सरोवरातील पाणी खारट आणि अल्क धर्मी असल्याने यात कधीही कुठलाही सजीव आढळला नाही मात्र आता मासे आढळत असल्याने जगभरात या सरोवराची पुन्हा चर्चा व्हायला लागली आहे. लाखो वर्षांचा बदलता इतिहास सध्या आपण बघत असून लोणार सरोवरातील मासे भविष्याकाळात  एनाकोंडा किंवा डायनासोर ही होऊ शकतात असं स्थानिकांचं मत आहे यामुळे पर्यावरणासह मानव जातीलाही धोका निर्माण होऊ शकतो असं तज्ञांचे मत आहे आणि यामुळे या सरोवाराला युनेस्कोने दिलेला रामसर दर्जा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे संबंधित प्रशासन, जागतिक स्तरावरील पर्यावरण वाद्यांनी या बदलत्या लोणार सरोवराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Diesel Shortage: संतापाचा कडेलोट! बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांची रात्र पेट्रोल पंपावर, दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचं भयावह चित्र
संतापाचा कडेलोट! बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांची रात्र पेट्रोल पंपावर, दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचं भयावह चित्र
आधी पेट्रोल, डिझेल अन् CNG मध्ये दरवाढ, आता खरीप हंगामाच्या तोंडावर इंधनाची भीषण टंचाई, परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पंपांवर रांगा, बळीराजा दुहेरी संकटात
आधी पेट्रोल, डिझेल अन् CNG मध्ये दरवाढ, आता खरीप हंगामाच्या तोंडावर इंधनाची भीषण टंचाई, परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल डिझेलसाठी रांगा, बळीराजा दुहेरी संकटात
Petrol and Diesel in Maharashtra: परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
PM Narendra Modi Norway Visit 2026: भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
Embed widget