एक्स्प्लोर

Buldhana Water : बुलढाण्यात पाण्यासाठी पहिला बळी, आठ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू 

Buldhana Water Scarcity: पाणी आणायला गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला, अजिंठा मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. 

बुलढाणा: जिल्ह्यात पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. देऊळघाट येथील एक आठ वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता तिचा पाय घसरला आणि ती 70 फुट खोल विहिरीत पडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने जिल्हा समान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आलं. मात्र उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. हा पाण्यासाठी जिल्ह्यातील पाहिला बळी गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

देऊळघाट येथे गेल्या 70 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. 25 हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट येथील धनगरवाडी परिसरातील अंजली भरत शेजोळ ही बालिका पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्याच वेळी तिचा पाय घसरून 70 फुट खोल विहिरीत पडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच विहिरीत पडण्याची ही 10 वी घटना आहे. या विहिरीत आतापर्यंत 10 जण पडले आहेत, यातील नऊ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान या पाणी टंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग आडवून धरला आहे.

या परिसरात कायमची पाणी टंचाई असून पाण्याच्या बाबतीत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जातात. मात्र देऊळघाट वासियांची कायमस्वरूपी तहान भागविण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. त्रस्त नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.

वेळ पडल्यास पाणी कपातीचा निर्णय : गुलाबराव पाटील 

मागील वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं सध्या फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र वाढत जाणाऱ्या कडक पडणाऱ्या उन्हामुळं पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळ यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही पडला तर पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केलं आहे.

नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार 

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. पावसाळा लांबल्यास पाण्याचं नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात आठवड्यातून एकवेळ पाणी कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल अखेर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी की दोन दिवस याचा निर्णय होणार आहे. पाणी कपातीचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 48 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत म्हणणेच पाच महिने पुरवायचे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 62 टक्के पाणीसाठा, मुकणे धरणात 59 टक्के, मालेगांवची तहान भागविणाऱ्या गिरणामध्ये 33 टक्के, दारणा धरणात 63 टक्के, पालखेड 58 टक्के पाणीसाठा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget