एक्स्प्लोर

Buldhana Accident : स्टेअरिंग लॉक होऊन चालू एसटी बस पलटी, अन् बसमध्ये 25 प्रवासी

Buldhana Bus Accident : चालू एसटीचं स्टेअरिंग लॉक झालं आणि बस पलटी होऊन अपघात घडला आहे. या अपघातात विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

चिखली : बुलढाण्यातील अपघातांची (Buldhana Accident) मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. बुलढाणा जिल्ह्यात आज एक बस अपघात घडला आहे. एसटी बसचं (ST Bus Accident) स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पटली झाल्याची धक्कादायक घटान चिखली येथे घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी सात वाजताच्या सुमारात एसटीचा अपघात झाल्याची माहिती आहे. बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते.

स्टेअरिंग लॉक होऊन चालू बस पलटली

प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याने काही जण जखमी झाले आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बुलढाणा - सवणा ते चिखली एसटी बसला अपघात झाला. स्टिअरिंग रॉड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. यामुळे चालकासह दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही एसटी बस सवणावरून चिखलीच्या दिशेने जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे 25 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सात वाजेदरम्यान ही घटना घडली. 

चालक आणि प्रवासी जखमी, जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

सकाळी सातच्या सुमारास सवणा ते चिखली बसचा अपघात झाला. बसच्या स्टेअरिंगचा रॉड लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांचे पालकही घाबरले आणि सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच काही विद्यार्थीही जखमी झाले आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमका अपघात कसा घडला?

आज सकाळी चिखली तालुक्यातील सवना येथून 25 प्रवासी घेऊन चिखलीकडे निघालेल्या बसचा स्टेरिंग लॉक झाल्याने एका वळणावर ही बस सरळ वीस फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. या बस मध्ये बारा ते पंधरा विद्यार्थी देखील होते बस स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात 17 प्रवासी ज्यात 12 ते 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत नशीब बलवत्तर बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे .यात चालकही जखमी झाला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या जुनाट व नादुरुस्त बसेस मुळे जिल्ह्यात सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samruddhi Mahamarg : 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Leopard Attack: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; उपचारादरम्यान मृत्यू
वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस सुरूच!
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Leopard Attack: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; उपचारादरम्यान मृत्यू
वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस सुरूच!
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Nanded crime: 'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट
'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट
Faf Du Plessis : मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, PSL मध्ये खेळणार
Embed widget