एक्स्प्लोर

ठाण्यापाठोपाठ BMC कर्मचाऱ्यांची खातीही अॅक्सिसमधून वर्ग होणार?, महापौर पेडणेकर काय म्हणाल्या...

मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय कलगीतुऱ्यांमुळं अॅक्सिस बँकेला अजून एक झटका बसण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेने अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेमध्ये वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिका देखील असा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय कलगीतुऱ्यांमुळं अडचणीत आलेल्या अॅक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  ठाण्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचाही कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा विचार सुरु आहे, तशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ठाणे महानगरपालिकेच्या निर्णयाबद्दल वाचलं. महापालिकेत असा निर्णय करायचा असेल तर आमचे गटनेते आणि सर्व नेत्यांची चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या.  आमच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अॅक्सिस बँक 40 लाखांचा विमा देते. त्यामुळे प्रथमता याची खात्री केली जाईल की इतर कोणती 40 लाखांचं सुरक्षा कवच देते का?, यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही पेडणेकर म्हणाल्या.
या विषयासंदर्भात मी सोमवारी माझ्या पालिकेतील इतर नेत्यांसोबत बैठक घेणार आहे आणि चर्चा करणार आहे. तसेच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. याबाबत त्यांना देखील विचारात घेतलं जाईल. शेवटी यावर सगळ्यांचं एकमत होणं गरजेचं आहे. तरच निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या. 
पेडणेकर म्हणाल्या की, आज पंजाब नॅशनल बँकेसारखी बँक बुडीत निघाली. प्रत्येकाला आपल्या पैशांची काळजी असते की आपल्या मेहनतीचा पैसे असा बुडू नये. आम्हीही याची काळजी घेऊ की मुंबईकरांचा आणि करदात्यांचा पैसा असा कुठल्याही बँकेत जाऊ नये, ज्या बुडीत जाऊ शकतात. त्यापेक्षा दोन टक्क्यांनी कमी जरी पैसे मिळाले तरी चालेल, तरी ते पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत असतील. त्यामुळे ते पैसे सुरक्षित राहतील, या दृष्टीने आम्ही विचार करू, असे त्या म्हणाल्या. मात्र यासाठी आम्हाला आधी सर्वांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. अग्निशामक दलाचे पगार अॅक्सिस बँकेत जातात. त्या कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांचा होकार येणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे देखील पेडणेकर यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेत वळवणार अॅक्सिस बँकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात येणार असल्याची शक्यता असताना आता ठाणे महागरपालिकेने काल मोठा निर्णय घेतला. ठाणे महानगरपालिका अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवणार आहे. अॅक्सिस बँकेत सध्या ठाणे महानगपालिकेतील एलबीटीचे खाती, टॅक्स खाती आणि कर्मचाऱ्यांचे पगार अशी खाती सध्या अॅक्सिस बँकेत आहे. आता ही सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : महिलांना 1500 रूपये देऊन खुश केलं जातंय पण लोकांना परिवर्तन हवं आहेAjit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
×
Embed widget