Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदानकार्ड जमा केले, बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले; विरोधकांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय?
Ambadas Danve Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदानकार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ambadas Danve Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेबरला मतमोजणी पार पडेल. मात्र याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरा नगर भागातील एक घटना समोर आली आहे.
मतदानकार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिम मतदार संघात ही घटना घडली आहे. आपल्या मत मिळणार नाही अशा लोकांनी मतदान करु नये म्हणून दीड हजार रुपये देऊन मतदानकार्ड जामा केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत तब्बल पाच हजार मतदानकार्ड जमा केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्यात सदरील व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली सदर प्रकरणावर ट्विट करत भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे, असं अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले.
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 18, 2024
संजय शिरसाट काय म्हणाले?
सदर प्रकरणावर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी माझाशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पराभव जवळ दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकल्याने असे बिनबूडाचे आरोप विरोधक करत आहेत.
अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला-
छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर मतदार संघात उभा असलेले अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. गळणीम रोडवर सोनवणे यांनी गाडी आडवली. यानंतर 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केली.
संबंधित बातमी:
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर