Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा विजेता कोण होणार? 'Top 5' स्पर्धकांमध्ये 'या' नावांची चर्चा
Bigg Boss 16 Grand Final: सलमान खानचा 'बिग बॉस' आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Bigg Boss 16 Top 5 Finalists : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. 100 दिवसांचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाअंतिम सोहळा जवळ आल्याने या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तसेच, यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत.
'बिग बॉस 16'च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये 'या' नावांची चर्चा (Bigg Boss 16 Top 5 Finalists)
'बिग बॉस 16'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये एमसी स्टॅन (MC Stan), शिव ठाकरे (Shiv Thakare), सुम्बुल तौकीर (Sumbul Touqer), शालीन भनोट (Shalin Bhanot), निमृत कौर अहलूवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) या स्पर्धकांचा समावेश होऊ शकतो.
'या' दिवशी रंगणार 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले (Bigg Boss 16 Grand Finale)
'बिग बॉस 16'ची (Bigg Boss) चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. या पर्वातील स्पर्धक, त्यांच्यातील वाद आणि मैत्रीने हे पर्व चांगलच गाजवलं. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असून या पर्वाच्या ग्रॅंड फिनलेकडे (Grand Finale) सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाचा ग्रॅंड फिनाले 11 आणि 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
श्रीजिता डेचा (Sreejita De) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रीजिता 'बिग बॉस 16'च्या या पर्वातील टॉप 3 (Top 3) स्पर्धकांबद्दल भाष्य करताना दिसत आहे. ती म्हणतेय,"या पर्वातील 'टॉप 3' स्पर्धकांमध्ये शालीन भनोट, प्रियंका चौधरी आणि शिव ठाकरे असू शकतात."
View this post on Instagram
सलमान खान घेणार 'बिग बॉस 16'चा निरोप?
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान 'बिग बॉस 16'चा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस'शी असलेला करार संपत असल्याने भाईजान या कार्यक्रमाचा निरोप घेणार आहे. तसेच 'बिग बॉस 16' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीतदेखील मागे पडला आहे. त्यामुळे आता करण जौहर (Karan Johar) भाईजानची जागा घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिव ठाकरे होणार विजेता?
'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) मराठीप्रमाणे हिंदी 'बिग बॉस'देखील गाजवतो आहे. 'बिग बॉस 16' शिव ठाकरे जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याने तो या पर्वाचा विजेता होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :