Bhiwandi News : भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली, किराणा दुकानासह दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, दैव बलवत्तर म्हणून...
Bhiwandi Building Collapsed : भिवंडी शहरातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी शहरातील आजमी नगर - हाफिज नगर परिसरात एक मंजीला इमारत कोसळलीय.

Bhiwandi Building Collapsed : भिवंडी शहरातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी शहरातील आजमी नगर - हाफिज नगर परिसरात एक मंजीला इमारत कोसळलीय. चाळीस वर्षे जुनी ही इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर किराणा दुकान आणि वरच्या मजल्यावर रहिवाशी राहत होते. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वरच्या मजल्यावर कोणीही नव्हतं . दरम्यान, इमारत कोसळल्यानंतर दुकानदाराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस, भिवंडी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन दाखल झाले असून हा दिगार बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तर इमारतीच्या आजूबाजूचा परिसर देखील खाली करण्यात आला आहे. सध्या महानगरपालिकेच्या वतीने हि इमारत निष्काषित करण्यात येत आहे.
Kalyan Crime : कल्याणमध्ये फटाक्यांवरून तुफान राडा, 7 गावगुंडांना अटक, 6 जणांना पोलीस कोठडी!
कल्याणमधील मोहिने आणि लहुजी नगर परिसरात दोन गटांमध्ये फटाक्यांच्या दुकानावरून झालेल्या वादातून मोठी हाणामारी झाली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात गावगुंडांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ‘या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी सहा जणांना पोलीस कोठडी आणि एकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. याव्यतिरिक्त, लहुजी नगरमधील पाच महिलांसह इतर तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले गेले, ज्यात न्यायालयाने पाचही महिलांना न्यायालयीन कोठडी आणि तीन पुरुषांना पोलीस कोठडी सुनावली. फटाक्यांच्या वादातून सुरू झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भरधाव बाईकच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
नवी मुंबईतील यादव कुटुंबाच्या दिवाळीतील आनंदावर एका भीषण अपघाताने विरजण पडले. बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये (Sanjay Gandhi National Park) भरधाव बाईकच्या धडकेत दीड वर्षांच्या मानसी यादवचा (Mansi Yadav) मृत्यू झाला. 'टायगर सफारी'जवळ (Tiger Safari) झालेल्या या अपघातात मानसीला धडक दिल्यानंतर, आरोपी बाईकस्वार विनोद केवळे (Vinod Kevale) घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, कस्तुरबा मार्ग पोलिसांनी (Kasturba Park Police) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी विनोद केवळेला अटक केली आहे. मानसी आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या सुट्टीत पार्क फिरायला आली असताना ही दुःखद घटना घडली. यादव कुटुंब नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी असून, मानसीला प्राणी पाहण्याची खूप आवड असल्याने तिचे वडील तिला राष्ट्रीय उद्यानात घेऊन आले होते.


















