एक्स्प्लोर

Buldhana Water Scarcity : उन्हाचा चटका वाढला, बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट; पाणीटंचाईची शक्यता

Buldana News : राज्यात सध्या तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे.

Buldhana News : गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Increase Temperature) वाढ होत आहे. राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, सध्या उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. याचा परिणाम धरण (Dam) आणि तलावातील (Lake) पाणीसाठ्यावर होत आहे. झपाट्याने पाण्याची पातळी कमी (Low water level) होत असल्याचं चित्र आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातही उन्हाचा कडाका वाढल्याने धरणांमधील जलसाठ्यात घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 52.86 टक्के एवढा जलसाठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि सात मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात 23 टक्क्यांची घट झाली आहे. 

पाऊस चांगला झाल्याने पाण्याची पातळीत वाढ झाली होती

गेल्या वर्षी पावसाळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. परतीचा पाऊसही चांगला झाला होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये तलावांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, सध्या राज्यात तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा कडाका जाणू लागल्याने त्याचा पाण्याच्या पातळीवर होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच झपाट्याने पाणीसाठी कमी होत आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी घट

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पत गेल्या महिन्यात 56.59 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर आता 45.79 टक्के जलसाठा आहे. यावरुन पाण्याची पातळी किती झपाट्याने कमी होते ते दिसत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही मोठ्या तीन आणि मध्यम सात प्रकल्पात दिसून येत आहे. 37 लघु प्रकल्पातील पाणी पातळीतही मोठी घट होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या कडाक्यामुळे ही घट होत असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीलाच वाढत्या तापमानामुळे जर अशी घट होत असेल, तर उन्हाळ्यात (Summer) जिल्ह्यातील काही भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडी

राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था विदर्भासह राज्यातील काही भागात दिसून येत आहे. येणारा उन्हाळा विदर्भवासियांसाठी नेहमीपेक्षा जास्त कठीण असेल याची चाहूल आताच लागायला लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Vidarbha Temperature : विदर्भात तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
Bhandara News: गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
Maharashtra Rain: तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget