Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल एक खळबळजनक दावा केला... एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी रुपये आणले आणि ते आपल्याला दिल्याचं सांगिल्याचं जरांगे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात सांगितलं... तिथून सुरू झाला आरोप-प्रत्यारोपांचा खेळ... मुंबईतल्या नेस्को मैदानात संध्याकाळी झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी जरांगेंवर प्रचंड तोंडसूख घेतलं... तर जरांगे यांनी पुरावे द्यावेत, त्यानुसार चौकशी करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय... या घटनांमुळे एकेकाळी शिंदेंचे निकटवर्ती मानले जाणारे जाणारे जरांगे अचानक एवढे आक्रमक का झालेत? बघुयात माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...
ठाण्याचा बाजार उठवणार...
म्हणत उघड उघड शिंदेंना आव्हान दिलं होतं..
आणि त्यांच्या याच आव्हानला एक महिना पूर्ण होण्याआधी..
जरागेंनी दुसरा बॉम्ब टाकलाय..
आता तो बॉम्ब राजकीय उलथापालथ करणारा ठरणार..
की त्याचा आवाज फक्त आरोपांपुरता मर्यादीत राहणार..
हे गुरूवारी सकाळी कळेल..
All Shows
































