Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल, असेही राज यांनी म्हटले. संजय राऊत यांनी रेजीम चेंजबद्दल म्हटलं, माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. पुढच्या दोन-पाच महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, असे म्हणत राज ठाकरे यांनीही संजय राऊतांची री ओढली आहे. एपस्टिन बरोबरचा फोटो बाहेर आला आहे, खूप गोष्टी बाहेर येणार, हे थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका करत राहणार आणि ही गोष्ट थांबणार नाही. येत्या काही वर्षात देश रस्त्यावर आला तर मला नवल वाटणार नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी राजकीय भाकीत केलं आहे. देशात नीट आंदोलन झालं तेव्हा मुलं बाहेर आली होती, ती फक्त नीटसाठी आली नव्हती. कुठला ना कुठला राग लोकांच्या मनात आहे, तो व्यक्त करण्यासाठी आली होती. राज्यात दुष्काळ जाहीर केलाय, अन्नधान्य टंचाई येतील इतर परिस्थिती सरकारला झेपणाऱ्या नाहीत. पुढे छोटा काळ असा येईल जिथे देशाला पंतप्रधानच नसेल, असेही राज ठाकरेंनी म्हटले. आंदोलनात अराजकता कुठे आली, शांततेने आंदोलन करणाऱ्या पोरांवर लाढीचार्ज तुम्ही केला, त्या मुलांनी काहीच केलं नव्हतं. भाजप जुने दिवस विसरले काय? पुढच्या वेळेस त्यांचे छायाचित्र लावा, असे म्हणत आंदोलकांची बाजू राज टाकरेंनी घेतली.





















