Bail Pola : भंडारा जिल्ह्यात पोळ्यानिमित्त लाकडी बैलांची मागणी वाढली, खरेदीसाठी मोहाडीत गर्दी
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा (bhandara) जिल्ह्यात लाकडी बैलांची मागणी वाढली आहे.जिल्ह्याच्या बाहेरील व्यापारी देखील लाकडी बैलांची खरेदी करण्यासाठी मोहाडी शहरात गर्दी करताना दिसत आहेत.
![Bail Pola : भंडारा जिल्ह्यात पोळ्यानिमित्त लाकडी बैलांची मागणी वाढली, खरेदीसाठी मोहाडीत गर्दी demand for wooden bullocks increased for the purpose of Bail Pola In Bhandara district Bail Pola : भंडारा जिल्ह्यात पोळ्यानिमित्त लाकडी बैलांची मागणी वाढली, खरेदीसाठी मोहाडीत गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/23/15d2e626fe8569d11cc214ff704cebdf1661249280775339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bail Pola : बैल पोळ्याचा (Bail Pola) सण हा जवळ आला आहे. त्यानिमित्त बाजपेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य देखील आले आहे. दरम्यान, या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा (bhandara) जिल्ह्यात लाकडी बैलांची मागणी वाढली आहे. जिल्ह्याच्या बाहेरील व्यापारी देखील लाकडी बैलांची खरेदी करण्यासाठी मोहाडी शहरात गर्दी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे 300 रुपयांपासून ते 7 हजार रुपयापर्यंत किंमतीचे लाकडी बैल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील मार्केट फुलू लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यात लहान मुलांच्या तान्हा पोळयाचीही क्रेज वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लाकडी बैलाची आवक एकट्या मोहाडीतून पूर्ण होत आहे. सुबक आणि नक्षीकामाने युक्त लाकडी बैल मोहाडित मिळत असल्याने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी गर्दी करतात. दरवर्षी मोहाडित या लाकडी बैलांच्या खरेदीसाठी व्यापारी येत असून या व्यवसायात लाखोंची उलाढाल होत असते. मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या संकटामुळं हा व्यापार ठप्प झाला होता. मात्र, यंदा व्यापार चांगला होणार असल्याचे कारागिर सांगत आहेत.
बैल पोळा सणानिमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत. पोळा सण काही दिवसावर आल्याने सणासाठी लागण्याऱ्या साहित्य खरेदेसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. यंदा तुरळक मात्र योग्यवेळी झालेल्या पावसामुळे पिके बहरली आहेत. त्यामुळे उत्पन्न हाती येण्याची आशा निर्माण झाली आहे. कृषीसंकृतीमध्ये बैलाला अनन्यसाधारण महत्व आहे. शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मैत्र आहे. बैलांच्या वर्षभर केलेल्या श्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र सतत पडणारा दुष्काळ, तंत्रनज्ञाचा वाढता वापर, त्यामुळे पशूधनात मोठी घट झाली आहे. तरीही बैलजोडीवर शेती करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पोळा सण काही दिवसावर आल्याने, सणासाठी लागणाऱ्या साहित्यांने शहरातील बाजारपेठ फुलली आहे.
पोळ्याच्या सणादिवशी बैलाला सजवले जाते. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांच्या साज श्रृंगारासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करीत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आठवडेबाजारात शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळिराजा हात ढिला सोडत आहे. खरिपाचे पीक जोमदार असल्यामुळे बळिराजांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Bail Pola Festival : शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, का साजरा केला जातो बैलपोळा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)